CM Pramod Sawant 
गोवा

CM Pramod Sawant | पर्वरीत नियोजनपूर्वक, लोकोपयोगी विकासकामे

CM Pramod Sawant | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : सुकूर-पर्वरी येथे जिमखाना प्रकल्पाचे थाटात उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

पर्वरी : पुढारी वृत्तसेवा

पर्वरी - २०१२ साली हा नवीन मतदारसंघ निर्माण झाला असून येथे नियोजनपूर्वक विकासकामे होत आहेत. पर्वरी हे गाव राहिले नसून तिचे शहरीकरण होऊ लागले आहे. पाच साडेपाच वर्षांच्या कालावधीत आमच्या विविध सरकारी खात्याच्या सहकार्याने मतदारसंघात लोकोपयोगी विकासकामे होत आहेत आणि उर्वरित कामे २०२७ पर्यंत होणार आहेत. पर्वरीकर भाग्यवान आहेत त्याना रोहन खंवटेसारखा आमदार लाभला आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्विमिंग पुलासह अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून जिमचे साहित्य, विविध क्रीडा प्रकार या पर्वरी जिमखान्यात उपलब्ध करण्यात आले असून त्याचा लाभसर्वानी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. सुकूर येथील पर्वरी जिमखान्याच्या उद्घाटनसमयी ते बोलत होते. यावेळी खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार मायकल लोबो, सुकूरचे जिल्हा पंचायत सदस्य अमित अस्नोडकर, सरपंच सोनिया संजय पेडणेकर, सरपंच स्वप्नील चोडणकर, पंचायत संचालक महादेव आरोंदेकर गोवा राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी आणि तिन्ही पंचायतीचे पंच सदस्य उपस्थित होते.

जीएसआयडीसी अध्यक्ष मायकल लोबो यांनी आपल्या वक्तव्यात पर्वरी जिमखाना या प्रकल्पाला सुमारे ५८ कोटी रुपये खर्च आला असून तब्बल १२ वर्षे हा प्रकल्प पूर्ण होण्यास लागली आहेत. काही अडथळ्यांमुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब लागला. विरोधात राहून सरकार दरबारी कसे काम करून घ्यावे हे त्यांच्याकडून 'शिकावे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा जिमखाना पूर्ण करून घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, असे उदगार काढले.

मंत्री रोहन खंवटे यांनी निवडणुकीपूर्वी सादर केलेल्या जाहीरनाम्याप्रमाणे आम्ही विकासकामे केली आहेत. तिन्ही पंचायतींच्या आणि नागरिकांच्या साहाय्याने विकास कामे हाती घेतली आणि ती पूर्णही केली आहेत. पर्वरी जिमखाना आणि क्रीडाप्रकल्पाचे काम २०१३ साली हाती घेतले होते.

मध्यंतरी दोन कंत्राटदार सोडून गेले; परंतु मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि आमदार मायकल लोबो यांच्या सहकार्यामूळे हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. पर्वरीत आरोग्य केंद्राची व्यवस्था केली, पर्वरीकरांना पाण्याची टंचाई भासू नये म्हणून जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण केला. तिन्ही पंचायत क्षेत्रात उत्तम साधनसुविधा प्राप्त करून दिल्या. आता उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरु झाले असून येत्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे नंतर यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

प्रारंभी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते फित कापून जिमखाना प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी विविध क्रीडा कक्षात जाऊन क्रीडा साहित्याचे अवलोकन केले. व या जिमखाना प्रकल्पात जिम, बॅडमिंटन कोर्ट, स्विमिंग पूल, टेबल टेनिस कोर्ट, बुद्धिबळ / कॅरम क्रीडा कक्ष आणि विविध क्रीडा प्रकारांसाठी स्टेडियम यांचा समावेश आहे.

आंतराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प

खासदार सदानंद शेट तानावडे यांनी, नवीन तंत्रज्ञान वापरून जिमखान्यातील विविध क्रीडा साधने उपलब्ध करून दिली असून हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचाच झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' आणि सबका प्रयास या संकल्पनेप्रमाणे सरकार कार्य करीत आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर विकासकामे होत आहेत, असे उद्‌गार काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT