CM pramod Sawant 
गोवा

CM Pramod Sawant | डॉ. आर्मिडा फर्नांडिस मुख्यमंत्र्यांकडून सन्मानित

CM Pramod Sawant | या क्रांतिकारी उपक्रमामुळे अकाली जन्मलेल्या व दुर्बल नवजात बाळांना सुरक्षित पोषण मिळाले तसेच बालमृत्यू दर कमी होण्यास मोठी मदत झाली.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील मोलाच्या योगदानासाठी यावर्षी पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी व मूळ गोमंतकीय असलेल्या नामवंत नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. अर्मिडा फर्नांडिस यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सन्मान केला व त्यांच्याशी संवाद साधला.

डॉ. फर्नांडिस यांनी लोकमान्य टिळक हॉस्पिटल, मुंबई येथे आशियातील पहिली मानवी दूधपेढी (ह्युमन मिल्क बँक) सुरू करून वैद्यकीय क्षेत्रात इतिहास घडवला.

या क्रांतिकारी उपक्रमामुळे अकाली जन्मलेल्या व दुर्बल नवजात बाळांना सुरक्षित पोषण मिळाले तसेच बालमृत्यू दर कमी होण्यास मोठी मदत झाली. त्यांचा सन्मान करताना केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक उपस्थित होते.

तसेच स्नेह या संस्थेमार्फत त्यांनी वंचित भागातील महिला व बालकांच्या आरोग्य व कल्याणासाठी अविरत कार्य केले आहे. त्यांच्या आयुष्यभराच्या समर्पित सेवेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक तसेच तरुण आरोग्यसेवकांना सतत प्रेरणा मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT