Michael Lobo Birthday Celebration  
गोवा

Michael Lobo Birthday Celebration | पर्यटन वृद्धीसाठी मायकल लोबोंचे मोठे योगदान

Michael Lobo Birthday Celebration | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : वाढदिनी आमदार मायकल लोबोंवर शुभेच्छांचा वर्षाव

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

कळंगुट मतदार संघाचे आमदार तथा गोवा साधन सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष मायकल लोबो यांचा ५० वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरा करण्यात आला. आमदार मायकल लोबो यांच्या वाढदिनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हजेरी लावली होती.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, मतदार संघाचा विकास साधावा, हे आमदार लोबो यांनी दाखवून दिलेले आहे. विकास म्हणजे काय हे मायकल लोबो यांच्या मतदारसंघाकडे पाहून दिसून येते. लोबो यांनी पर्यटन वृद्धीसाठी खूप काही केले आहे. त्यांच्या या कार्यात पत्नीचेही त्यांना सदैव सहकार्य लाभले आहे. यापुढेही त्यांच्या हातून असाच भरघोस विकास व्हावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर

आमदार मायकल लोबो यांना शुभेच्छा देण्यासाठी गोवा भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक माजी मंत्री तथा आमदार नीलेश काब्राल, आमदार तथा माजी सभापती गणेश गावकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, पर्यटन मंत्री रोहन खवंटे, कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर, आमदार देविया राणे,

उपसभापती तथा म्हापसाचे आमदार जोशुआ डिसोझा, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष केदार नाईक, माजी आमदार ग्लेन टिकलो, आमदार तथा गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो, आमदार विजय सरदेसाई तसेच भाजपाचे पदाधिकारी, मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्य, वेगवेगळ्या पंचायतीचे सरपंच, पंचायत सदस्य व मतदार संघातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT