गोवा

Goa Swimming Pool News - बंद स्वीमिंग पुलामुळे आजारांची भीती

बोरीमळ-केपे येथील प्रकल्प; पाणी दूषित झाल्याने डासांची पैदास वाढली

पुढारी वृत्तसेवा

सांगे: बोरीमळ, कैपे येथील खेळ संकुलात बांधालेला स्विमिंग पूल मागौल १४ जुलै २०२५ पासून बंद असल्याने त्यातील पाणी दूषित झाले असून त्यात जंतू निर्माण झाले आहेत. तसेच डासांची पैटास वाढल्याने टायफॉइड, कॉलरा, गॅस्ट्री यांसारखे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा स्वीमिंग पूल अनेक वर्षे चांगल्या पद्धतीने सुरू होता. येथे लाईफगार्ड व कोचही कार्यरत होते. मात्र, गेल्या दहा महिन्यांपासून कोच व लाईफगार्ड मसल्यामुळे स्विमिंग पूल बंद पडल्याचे सांगण्यात येत आहे.

आज सरकार मोठमोठे प्रकल्प उभारते; मात्र ते पूर्ण झाल्यानंतर त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने उभारते; मात्र ते पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा प्रकल्पांची दुर्दशा होत असल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्यांत प्रचंड उकाडा असतो. गेल्या दोन महिन्यांत उष्णतेची तीव्रता वाढल्याने लहान मुले व इतर नागरिक जीव धोक्यात घालून नदी ठिकाणी जात आहेत. त्यामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत.

हा स्वीमिंग पूल सुरू असता तर अनेकांचे प्राण वाचले असते, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. राज्यात अनेक युवक नोकरीच्या शोधात आहेत; पूल सुरू झाल्यास रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. जनतेच्या करातून उभारलेल्या या प्रकल्पाची देखरेख करणे ही सरकारची जबाबदारी आहे. तसेच प्रसाधन कक्षाचीही अवस्था अत्यंत बिकट असून त्यामुळे येथे येण्यास नागरिक कचरतात, स्थानिक आमदारांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्वीमिंग पूलची सध्याची स्थिती अत्यंत वाईट असून त्यात बुरशी व किडे निर्माण झाले आहेत. पूलची नियमित देखभाल होत नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

- सुखला केणी, नागरिक

सरकारने लक्ष द्यावे

सरकार मोठा खर्च करून सुविधा उभारते; परंतु कोच व लाईफगा-र्डच्या अभावामुळे स्वीमिंग पूल बंद राहणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचेही बोलले जात आहे. संबंधित खाते व आरोग्य विभागाने तातडीने लक्ष घालून स्विमिंग पूल स्वच्छ करून पुन्हा सुरू करावा, अशी मागणी होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT