Goa Cashew Festival 2026 pudhari photo
गोवा

Goa Cashew Production | गोव्याच्या काजूला चव छान, पण उत्पादकता कमी; राष्ट्रीय सरासरीपेक्षा राज्य मागे

Goa Cashew Production | राष्ट्रीय सरासरीपेक्षा उत्पादकता कमी असल्याने आयातीची गरज

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्याच्या अर्थव्यवस्थेसाठी, संस्कृतीसाठी काजू उत्पादन महत्त्वाचे आहे. ते एक प्रमुख नगदी पीक म्हणून काम करत असले तरी, कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील काजूची उत्पादकता राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे राज्यात मागणी इतका पुरवठा करण्यासाठी बाहेरून काजू आयात कराव्या लागतात.

गोव्यात उच्च काजू उत्पादन होत असले, तरी सरासरी उत्पादकता प्रति हेक्टर फक्त ४३७किलोग्रॅम इतकी आहे. जी राष्ट्रीय सरासरी ७६० किलोपेक्षा खूपच कमी आहे. राज्यात ५६, ९५३ हेक्टर जमिनीवर काजूचे पीक घेतले जाते, असे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गतवर्षी एकूण २४,८८२ टन उत्पादन झाले होते. ३७,४४७हेक्टर लागवडीखाली असलेल्या उत्तर गोव्यात राज्यातील एकूण काजू क्षेत्राच्या ६६ टक्के इतके आहे, तर दक्षिण गोव्यात १९,५०६ हेक्टर लागवडीखाली ३४ टक्के क्षेत्र आहे.

उत्तर गोव्यात, सत्तरी येथे काजू लागवडीखाली सर्वाधिक क्षेत्र १०,८५९ हेक्टर आहे, ज्याची उत्पादकता प्रति हेक्टर ४७९.९७किलो आहे, तर पेडणे येथे ९,०२७हेक्टर लागवडीखाली आहे आणि उत्पादकता प्रति हेक्टर ३३० किलो आहे.

डिचोली येथे ७,८६० हेक्टर क्षेत्र व्यापले आहे आणि त्याचे उत्पादन प्रति हेक्टर ४५१.६५ किलो आहे, तर बार्देशमध्ये ६,४५६ हेक्टर लागवडीखाली आहे.

उत्तर गोव्यात काजू उत्पादन १५,८१६ टन आहे, म्हणजेच प्रति हेक्टर ३९९.९३ किलो. दक्षिणेत सांगेत ५,५२० हेक्टर काजू लागवड आहे आणि येथे प्रति हेक्टर ४२७.५४ किलो उत्पादन मिळते, तर फोंडा येथे ३,५३२ हेक्टर काजू लागवड आहे.

सेंद्रिय काजू लागवडीला प्रोत्साहन

गोव्यात काजू पूर्ण पिकल्यानंतर आणि नैसर्गिकरीत्या जमिनीवर पडल्यावरच ते गोळा केले जातात. या पद्धतीमुळे गोव्यातील काजूची गुणवत्ता व चव सुधारते. गोव्यात काजूची लागवड ही पूर्व-सेंद्रिय पद्धतीने केली जाते. कारण, कोणतेही खत वापरले जात नाही किंवा स्थानिक जातींसाठी केवळ नगण्य प्रमाणात वापरली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT