Goa Cashew Festival 2026 pudhari photo
गोवा

Goa Cashew Festival 2026 | गोव्याच्या काजूचा दरवळ जगभर पसरणार! 10 ते 12 एप्रिल दरम्यान पणजीत रंगणार भव्य 'काजू महोत्सव'

Goa Cashew Festival 2026 | आमदार डॉ. देविया राणे : मार्गदर्शनासोबत शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

वन विकास महामंडळाचा चौथा काजू महोत्सव १० ते १२ एप्रिल या दरम्यान दयानंद बांदोडकर मैदान कांपाल पणजी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवांमध्ये काजू उत्पादन वाढीसाठी काजू उत्पादकांना आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शनासोबतच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात ३२ खाद्यान्नाचे स्टॉल, २४ मद्याचे, १६ काजू विक्रीचे आणि १६ स्टॉल महिला स्वयंसहाय्यता गटासाठी प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी दिली.

पणजी येथे आज गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी वन विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक अमर हेबळेकर उपस्थित होते. यावेळी डॉ. राणे यांनी सांगितले की, राज्यातील Meeti काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढावे, जेणेकरून बाहेरील काजू विक्रीवर नियंत्रण येऊ शकेल. यासाठी काजू उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि गोव्याच्या काजूला प्रसिद्धी देत पर्यटनासाठी हा महोत्सव आकर्षक करण्यासाठी काजू महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यावर्षी वाहने सुरळीत व सुरक्षित चालवा या थीमवर हा महोत्सव आहे.

काजू गोव्याचे पारंपारिक उत्पादन असल्यामुळे प्रत्येक काजू उल्पादकाला महोत्सवाचा लाभ मिळावा यासाठी गुरुवारी भागधारकांची बैठक घेतल्याचे डॉ. राणे यांनी सांगितले. लवकरच काजू बोर्ड स्थापन होणार आहे,

त्यानंतर राज्यात काजू उत्पादन वाढेल व बाहेरील काजू गोव्याचे काजू म्हणून विक्रीवर नियंत्रण येणार असल्याचे सांगून, जर गोव्यातील काजू उत्पादकांनी काजूला मिळालेला जीआयएस टॅग आपल्या पॅकेटवर लावला तर बाहेरील काजू गोव्याचे काजू म्हणून विक्री थांबेल, असे उत्तर डॉ. राणे यांनी एका प्रश्नावर बोलताना दिले.

गेल्या वर्षी या महोत्सवाला दरदिवशी १० ते १२ हजार लोकांची उपस्थिती होती. यावेळी त्यापेक्षा जास्त उपस्थिती राहील, काजू महोत्सव पर्यटन कॅलेंडरवर सामावून घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

काजू पाकिटावर जीआयटॅक लावा

लवकरच काजू बोर्ड स्थापन होणार आहे, त्यानंतर राज्यात काजू उत्पादन वाढेल व बाहेरील काजू गोव्याचे काजू म्हणून विक्रीवर नियंत्रण येणार असल्याचे सांगून, जर गोव्यातील काजू उत्पादकांनी काजूला मिळालेला जीआयएस टॅग आपल्या पॅकेटवर लावला तर बाहेरील काजू गोव्याचे काजू म्हणून विक्री थांबेल, असे उत्तर डॉ. राणे यांनी एका प्रश्नावर बोलताना दिले.

आगीच्या घटना झाल्या कमी

राज्यातील वनक्षेत्रामध्ये आग लागू नये, यासाठी वन विकास महामंडळाने मोठ्या प्रमाणात वन कर्मचारी विविध भागात तैनात केले आहेत. त्याचबरोबर त्या भागातील स्थानिक युवकांना स्वयंसेवक म्हणून नेमले आहेत. ज्यामुळे एखादी आगीची घटना घडल्यास त्वरित वन खात्याला कळवले जाते व त्यानंतर अग्निशमन खात्यातर्फे आगीवर नियंत्रण मिळवता येते. आग पसरत नाही, अशी माहिती अमर हेबळेकर यांनी यावेळी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT