पणजी : पुढारी वृत्तसेवा
इराण व अमेरिका यांच्या युद्धामुळे आखाती देशांत अडकलेल्या गोमंतकीयांची काळजी घ्यावी. त्यांची नेमकी संख्या किती आहे ती तपासून त्यांना सुरक्षा पुरवावी. त्यांना गोव्यात येण्यास मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार उल्हास तुयेकर, आमदार मायकल लोबो आदी अनेक आमदारांनी केली.
शून्य प्रहराला ही मागणी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, याबाबत नेमकी संख्या किती ते सोमवारी आपण उत्तर देणार असल्याचे सांगितले. शून्य प्रहर आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी मेणकुरे मध्ये रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची मागणी केली.
दाजी साळकर यांनी वास्कोतील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. पेजल खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मेपर्यंत वास्कोतील पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे आश्वासन दिले.
आमदार विरेश बोरकर यांनी बांबोळी येथील मनोरूग्णालयची नवीन इमारत लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. आमदार जीत आरोलकर यांनी गवे वस्तीत घुसले असून एका व्यक्तीला त्यांनी ठार केले आहे. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.
आमदार विजय सरदेसाई यांनी प्रोफेशनल महाविद्यालयांमध्ये रिवेलीशन फी पूर्वी पाच हजार रुपये प्रति पेपर होती तीही आता न घेता रिवेलेशन्स बंद करण्यात आले. विद्यार्थ्यावर अन्याय होत असून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली
अजित पवारांसह अनेकांना श्रद्धांजली
विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गेल्या सहा महिन्यांमध्ये ज्या मान्यवरांचे देशभरामध्ये निधन झाले होते, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अभिनंदनाचे ठराव
विधानसभेमध्ये अभिनंदनाचे ठराव मांडण्यात आले. यात दूध बँक स्थापन करणाऱ्या मूळ गोवेकर व पद्मश्री पुरस्कार डॉ. अर्मिता फर्नांडिस यांच्यासह अनेकांचे अभिनंदन करण्यात आले.