goa 
गोवा

Canacona Assembly Constituency: बहुरंगी लढत झाल्यास मतविभागणी? आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काय असेल चित्र

goa assembly election 2027: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काणकोणच्या राजकारणाची रंगू लागलेली समीकरणे

पुढारी वृत्तसेवा

Canacona Assembly Constituency Politics Explained

काणकोण : संजय कोमरपंत

गोवा विधानसभा निवडणुकीला अजून काही महिने अवकाश असला, तरी काणकोण मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग येऊ लागला आहे. विविध पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात संपर्क वाढविण्यास सुरुवात केली असून, २०२२ च्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही अनेक उमेदवार रिंगणात उतरल्यास त्याचा सर्वाधिक लाम विद्यमान आमदार तथा मंत्री डॉ. रमेश तवडकर यांनाच होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढत झाल्याने मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी झाली होती. भाजपचे रमेश तवडकर वांना २,०६३ मते मिळाली, तर अपक्ष काणकोणमध्ये डॉ. रमेश तवडकर, काँग्रेसचे जनार्दन भंडारी, गोवा फॉरवर्डचे शुभम कोमरपंत, माजी आमदार इजिदोर फर्नाडिस तसेच चेतन देसाई हे सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय जिल्हा पंचायत निवडणूक लढविलेले माजी सरपंच दया ऊर्फ उमेश गावकर यांनीही विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.

डॉ. रमेश तवडकर यांनी 'श्रमधाम' योजनेतून गरीबांना घरे, विविध विकासकामे आणि पायाभूत सुविधा या मुद्द्यांवर आपला भर कायम ठेवला आहे. इंजिदोर फर्नाडिस यांना ६,०१२, काँग्रेसचे जनार्दन भंडारी यांना ५,३५१, अपक्ष विजय पै खोत यांना ४,७२१, रिव्होल्यूशनरी गोवन्सचे प्रशांत पागी यांना १,५९९, तृणमूल काँग्रेसचे महादेव देसाई यांना १,०६६ आणि आपचे अड. अनुप कुडतरकर यांना ८३४ मते मिळाली होती. विरोधी मतांचे विभाजन झाल्याचा लाभ तवडकरांना मिळाल्याचे २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढत झाल्याने मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी झाली होती. भाजपचे रमेश तवडकर वांना २,०६३ मते मिळाली, तर अपक्ष मतदारांनी भाजप उमेदवारालाच पसंती दिली. त्यामुळे केवळ आरोपांवर मतदार विश्वास ठेवत नसल्याचे चित्र दिसून आले.

२०२२ व्या निवडणुकीत काणकोण नगरपालिकेतील अनेक नगरसेवक, बूथ समित्या, महिला व युवा कार्यकत्यांनी नियोजनबद्ध प्रचार केल्याचा फायदा भाजपला झाल्याचे मानले जाते. विशेषतः नगरपालिका क्षेत्रासह विविध पंचायतींमध्ये कोपरा बैठका घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्यात भाजपला यश आले होते.

पागी समाजातील मतविभागणी होण्याची शक्यता असतानाही भाजपने प्रभावी रणनीती आखली. इंजिदोर फर्नाडिस यांचा प्रभाव असलेल्या गावडोंगरी आणि सोतीगावसारख्या भागातही तवडकर यांनी आघाडी घेतली. यामुळे त्यांच्या संघटनात्मक ताकदीची प्रचिती आल्याचे बोलले जाते.

काणकोण मतदारसंघातील नगरपालिका आणि सहा पंचायतींतील ५९ यूथपैकी २८ बूथवर भाजपला आघाडी मिळाली होती. काणकोण नगरपालिका, श्रीस्थळ, पैंगीण, खोतीगाव, लोलये आणि आगोंद परिसरात भाजपला महत्त्वाचे यश मिळाले होते. टपाली मतदानातही भाजपने आघाडी घेतली होती.

सध्या मतदारसंघात सुमारे ३३ हजार मतदार असून, त्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. एसआयआर छाननी, काही मतदारांचे निधन आणि काहींनी पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारल्यामुळे मतदारसंख्येत घट झाली आहे.

मतदारसंघ एसटीसाठी राखीव चर्चा सुरू आहे. ही शक्यता लक्षात घेऊन क्षत्रिय मराठा समाजाने बैठक घेऊन एसटी आरक्षणाला विरोध दर्शविला होता. एकदा मतदारसंघ राखीव झाल्यास इतर समाजातील इच्छुकांना निवडणूक लढविता येणार नसल्याची भूमिका या बैठकीत मोडण्यात आली होती. मात्र, डॉ. रमेश तवडकर यांनी काणकोण मतदारसंघ एसटीसाठी राखीव होणार नसल्याचा दावा केला आहे.

पालिका निवडणुका अद्याप प्रलंबित असल्याने त्यांचाही परिणाम विधानसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले अनेकजण विधानसभा निवडणुकीतही उत्तरल्यास मतांची विभागणी होऊन त्याचा परिणाम प्रमुख उमेदवारांवर होऊ शकतो.

डॉ. रमेश तवडकर यांनी गेल्या काही वर्षात मतदारसंघात पाणीपुरवठा, भूमिगत वीजवाहिन्या, दुर्गम भागात वीज व रस्ते, हॉटमिक्स रस्ते, नगरपालिका सुशोभीकरण, कृषी भवन, मामलेदार संकुल यांसारख्या विकासकामांना गती दिल्याचा दावा केला आहे. गावणे येथील पाणी शुद्धीकरण प्रकल्प, नडके व केरी परिसरातील भूमिगत वीजवाहिन्या तसेच अभयारण्य परिसरातील पायाभूत सुविधा यांचा उल्लेखही केला जातो.

'श्रमधाम' योजनेतून बलराम चॅरिटेबल ट्रस्टमार्फत सुमारे ७५ गरीब कुटुंबांना घरे बांधून दिल्याचाही तवहकर यांच्या प्रतिमेला फायदा होऊ शकतो, असे निरीक्षकांचे मत आहे. क्षत्रिय मराठा समाजातील नेतृत्वाचा प्रश्न अद्यापही कायम असल्याचे दिसते. विविध निवडणुकांमध्ये समाजाची मते एकवटली नसल्याने राजकीय फायदा इतरांना होत असल्याची भावना व्यक्त केली जाते.

आगामी निवडणुकीत वेतन मंजू देसाई यांच्या नावाची चर्चा सुरू असली, तरी समाज कितपत एकसंघ राहतो, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. सध्या विविध पक्षांतील अनेक इच्छुक उमेदवार तयारीला लागले असले, तरी अंतिम क्षणी किती उमेद‌वार रिंगणात राहतात, मतांचे विभाजन कितपत होते आणि एसटी आरक्षणाचा प्रश्न कोणत्या दिशेने जातो, यावर २०२७ च्या निवडणुकीचे वित्र मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. २०२२ प्रमाणेच विरोधी मतांची विभागणी झाल्यास त्याचा लाभ पुन्हा एकदा रमेश तवडकर यांना मिळू शकतो, अशी चर्चा काणकोणच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT