Goa Assembly Election 
गोवा

Goa Assembly Election|माविनसह मंत्री, आमदार डेंजर झोनमध्ये

Goa Assembly Election Survey 2027- निवडणूकपूर्व सव्र्व्हेतील निष्कर्ष : मुख्यमंत्र्यांसह भाजपचे सहा, मगोचा एक आमदार सुरक्षित

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा विधानसभेच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत. त्यासाठी अडीच महिने बाकी आहेत. सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत, अशा स्थितीत एका खासगी वृत्तवाहिनीने केलेल्या पक्षनिहाय सर्वेक्षणात अनेक आमदार व काही मंत्र्यांच्या जागा धोक्यात असल्याचा निष्कर्ष जाहीर करण्यात आला आहे.

या सर्वेक्षणात सध्याच्या ३८ आमदारांपैकी मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्री व एका आमदाराचे स्थान पक्के असल्याचे सांगितले असून त्यात भाजपचे सहा आमदार व मगोचे मंत्री सुदिन ढवळीकर सुरक्षित दाखवले आहेत. विरोधी पक्षाचे सर्व आमदार एकतर ५० टक्के काठावर किंवा असुरक्षित दाखवले गेले आहेत. या सर्वेक्षणात अनेक वेळा निवडून आलेल्या मंत्री माविन गुदिन्हो यांच्यासारख्या काही दिग्गजांचे स्थान डळमळीत असल्याचे सांगितले आहे.

या सर्वेक्षणातील सुरक्षित जागांमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (साखळी), आरोग्य मंत्री विश्वजीत राणे (वाळपई), पर्यटन मंत्री रोहन खंवटे (पर्वरी), साबांखा मंत्री दिगंबर कामत (मडगाव), महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात (पणजी) मगोचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर (मडकई) व आमदार डॉ देविया राणे (पर्ये) यांचा समावेश आहे.

भाजपकडूनही आमदारांचे सर्वेक्षण

भाजपने स्वतःच्या आमदार व मंत्र्यांच्या कामकाजाची दोन सर्वेक्षणे आतापर्यंत केली आहेत. त्यात भाजपच्या २६ पैकी १७ आमदारांचे स्थान मजबूत असल्याचे दिसून आल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. आदिवासी (एसटी) समाजाला राजकीय आरक्षण न मिळाल्यास भाजपला तीन जागी धोका असल्याचे भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातून स्पष्ट झाल्याचे कळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT