RG MLA Viresh Borkar  
गोवा

RGP Dispute Resurfaces-आरजीपीतील वाद पुन्हा उफाळला

मनोज परब-वीरेश बोरकर यांच्यात पुन्हा 'सोशल मीडिया वॉर' : आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच

पुढारी वृत्तसेवा

पणजी : रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्षातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. माजी अध्यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर पुन्हा एकदा सोशल मीडियावर एकमेकांना भिडले असून दोघांमधील शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. नाव न घेता अप्रत्यक्षपणे आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

मनोज परब यांनी अंतर्गत मतभेदांना कंटाळून २१ मे २०२६ रोजी पक्षासह सक्रिय राजकारणाला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियापासूनही दूर राहणे पसंत केले होते. मात्र, अलीकडेच ते पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाले असून, त्यांनी केलेल्या पोस्टमधून वीरेश बोरकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केल्याचे दिसत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून बोरकर यांनीही सोशल मीडियावरून पलटवार केला आहे.

राजकारणाला सुरुवात होते, असा सूचक टोला मनोज परब यांनी सोशल मीडियावर लगावला. तर, वैयक्तिक फायद्यासाठी जेव्हा केवळ मतांसाठी खऱ्या दृष्टिकोनापेक्षा 'नॅरेटिव्ह'ला प्राधान्य दिले जाते, तेव्हा घाणेरड्या दूरदृष्टीशी तडजोड झाली की, राजकारण घाणेरडे वळण घेते. स्वार्थाला प्राधान्य दिले की, वेगळ्याच लॉबींना चालना मिळते, असा पलटवार आमदार वरिश बोरकर यांनी केला.

यामुळे आरजी पक्षातील मतभेद पुन्हा उघड झाले आहेत. एका बाजूला बोरकर हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मतदारसंघांत दौरे व कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत, तर दुसरीक मनोज परब यांचा गट या प्रक्रियेपासू दूर असल्याचे चित्र आहे.

या शाब्दिक संघर्षामुळे मनो परब पुन्हा राजकारणात सक्रि होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कार्यकर्त्यांकडून दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन मतभेद दूर करावेत आणि पक्षाच्या 'गोवा वाचवा' ध्येयाल नव्याने बळ द्यावे, अशी अपेक्षा व्यव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT