Drug Case Pudhari File Photo
गोवा

Kapil Jhaveri Drugs Case | अभिनेता कपिल झवेरीच्या अडचणीत वाढ! हणजूण व्हिला ड्रग्ज प्रकरणी आरोप निश्चितीचे आदेश

Kapil Jhaveri Drugs Case | हणजण व्हिला ड्रग्ज प्रकरणात अभिनेता कपिल झवेरीसह चौघांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश मेरशी येथील उत्तर गोवा विशेष एनडीपीएस न्यायालयाने दिले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

हणजण व्हिला ड्रग्ज प्रकरणात अभिनेता कपिल झवेरीसह चौघांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश मेरशी येथील उत्तर गोवा विशेष एनडीपीएस न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊन पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.

त्यावरील प्राथमिक सुनावणी होऊन हे आरोप रद्द करण्यासाठी सर्व संशयितांनी केलेली विनंती न्यायालयाने फेटाळली आहे. सहा वर्षांपूर्वी क्राईम ब्रँचने हणजूण येथील व्हिलावर टाकलेल्या अमलीपदार्थ छाप्याप्रकरणी अभिनेता कपिल झवेरी, आना लिलिया नुकामेंदी गोंझालेझ, ईव्हा अब्राहम ओव्हा आणि टोनी फर्नाडिस यांच्याविरुद्ध आरोप करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोपींनी आरोप निश्चिती केली जाऊ नये म्हणून अर्ज फेटाळताना न्यायालयाने कपिल झवेरी आणि इतर तिघांविरुद्ध प्रथमदर्शनी पुरेसे पुरावे असल्याचे नमूद केले. हे प्रकरण १६ ऑगस्ट २०२० रोजीचे असून, क्राईम ब्रँचने हणजूण येथील गावणवाडा भागातील एका व्हिलावर मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला होता.

यावेळी चरस, एमडीएम, एक्स्टसी आणि कोकेनसह विविध अमलीपदार्थ जप्त करण्यात आले होते. दरम्यान, एलेना व्लादमिर एमेलियानोव्हा हिच्या ताब्यातून जप्त केल्याचा दावा असलेल्या कोकेनचा फोरेन्सिक सायंटीफिक लेबोरेटरीचा अहवाल नकरात्मक आल्यानंतर न्यायालयाने तिला या प्रकरणातून दोषमुक्त केले होते. तसेच, या प्रकरणात अटक व गुन्हा दाखल करण्यात आलेले शैलेश शेट्टी यांच्याविरुद्ध पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले नसल्याची नोंदही न्यायालयाने घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT