पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास सुलभव्हावे, यासाठी आरोग्य खात्याने गोमेकॉने ११ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी या उपक्रमाचे उद्घाटन केले.
यावेळी त्यांनी गोमेकॉला एआय हब बनविण्याचे ध्येय असल्याचे सांगितले. यावेळी गोमेकॉचे अधिष्ठात डॉ. जे. पी. तिवारी, डॉ. पी. व्ही. राताबोली, डॉ. संदीप, विद्यार्थी प्रतिनिधी वेदांत माजिक, रिया शर्मा, तन्मय रायकर आदी होते. मंत्री राणे म्हणाले, गोव्याच्या वैद्यकीय क्षेत्रात एआयचा वापर वाढत जाईल.
एआयच्या वापराने वैद्यकीय क्षेत्रात विविध सुधारणा होतील. बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही एआयचा वापर खूप लाभदायी ठरेल. एआयच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय पुढे नेले जाईल. वैद्यकीय क्षेत्रासाठी एआयचा वापर लाभदायक ठरेल, असेही ते म्हणाले.