गोवा

MSME Swayamshakti Foundation | एमएसएमई- स्वयंशक्तीतर्फे मोफत 30 दिवशीय शासकीय कार्यशाळेला प्रारंभ

MSME Swayamshakti Foundation | कौशल्याला उद्योगाची जोड; उद्योजकतेची नवी वाट

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उद्योग उभारणीसाठी आवश्यक कौशल्य, शासकीय योजनांची माहिती आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे तंत्र आत्मसात करण्याची संधी उद्योजकांना उपलब्ध करून देण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) आणि स्वयंशक्ती स्त्री उद्यमी फाउंडेशन यांच्या वतीने मोफत शासकीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकरोड येथील एव्हिएस टेक्नॉलॉजी येथे या ३० दिवशीय कार्यशाळेचा प्रारंभ झाला आहे.

उद्घाटनप्रसंगी उद्योजक नानासाहेब देवरे आणि गुलाबराव आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढील ३० दिवस सहभागी उद्योजकांना बर्वे हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. देवरे यांनी, सोशल मीडिया मार्केटिंग, संगणक क्षेत्रातील वाढत्या संधी तसेच उद्योग क्षेत्रात कौशल्य विकासाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास लघुउद्योजकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याबरोबरच नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वयंशक्ती स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपाली चांडक यांनी संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे उद्योग क्षेत्रात निर्माण होणाऱ्या विविध संधींवर प्रकाश टाकला.
विविध प्रशिक्षणांच्या माध्यमातून अधिकाधिक सक्षम उद्योजक घडविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

कार्यशाळेसाठी शासनाकडून २५ प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली आहे. सहभागी प्रशिक्षणार्थींना उद्योग उभारणीसाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच उद्योगासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया, विविध कागदपत्रांची पूर्तता, शासकीय योजनांचा लाभ

घेण्याची पद्धत याबाबतही मार्गदर्शन व सहाय्य केले जाणार आहे.
याशिवाय बँकांच्या विविध कर्ज व आर्थिक योजनांची माहिती, उद्योगासाठी आवश्यक प्रकल्प अहवाल व प्रस्ताव तयार करण्याचे तांत्रिक मुद्दे, व्यवसाय व्यवस्थापन आणि डिजिटल माध्यमांचा वापर याबाबतही प्रशिक्षण दिले जाणार आहे. कार्यशाळेच्या समन्वयक म्हणून स्वाती देवरे काम पाहत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT