Umling La Expedition 2026 
गोवा

Umling La Expedition 2026: लडाखमधील जगातील सर्वात उच्च मोटरेबल पासवर महाराष्ट्राच्या तरुणांची मोहीम

Umling La Expedition 2026: पर्वरी, कळंगूट, खोर्जुवे आणि शिवोलीच्या तरुणांनी सर केला १९ हजार फुटांवरील उमलिंग ला पास

पुढारी वृत्तसेवा

शिवोली : राज्यातील चार साहसी तरुणांनी लडाखमधील जगातील सर्वात उंच मोटरेबल पास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'उमलिंग ला' (१९,०२४ फूट) येथे यशस्वी मोहीम पूर्ण करून राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अत्यंत प्रतिकूल हवामान, कमी प्राणवायू आणि खडतर डोंगररस्त्यांचा सामना करत त्यांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.

या मोहिमेत पर्वरीचे सुमित मुतकेकर, कळंगुटचे अतिश कळंगुटकर, खोर्जुवेचे अविनाश पणजीकर आणि शिवोलीचे सिद्धेश आगरवाडेकर यांनी सहभाग घेतला. नियोजन, धैर्य आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी हिमालयातील अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या या मार्गावर यशस्वी प्रवास केला. समुद्रसपाटीपासून १९,०२४ फूट उंचीवर असलेला उमलिंग ला हा विरळ हवा, थंडी, अवघड रस्त्यांमुळे साहसी वाहनचालकांसाठी आव्हान मानला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT