Rajasthan | बिस्किटांसोबत पाकिस्तानी झेंड्याचे फुगे विकणार्‍यास अटक Pudhari File Photo
गोवा

Nagali Hills Taleigao | नागाळी हिल्स-ताळगाव येथे शाब्दिक वादातून झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार संशयितांना पणजी पोलिसांकडून अटक

Nagali Hills Taleigao | नागाळी हिल्स-ताळगाव येथे शाब्दिक वादातून सागर कदम व त्याच्या मित्रांवर कोयत्याने, डंडुक्याने हल्ला केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
नागाळी हिल्स-ताळगाव येथे शाब्दिक वादातून सागर कदम व त्याच्या मित्रांवर कोयत्याने, डंडुक्याने हल्ला केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली. गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले होते. खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केले आहे.

तक्रारदार आणि साक्षीदारांचे जबाब तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली. फुलचंद साहनी (वय ३५), संजीव कुमार साहनी (१८), सुजीत कुमार साहनी (४०) आणि नितिश कुमार साहनी (१९) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.

हे सर्वजण बिहारमधील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ रोजी रात्री सुमारे १० वाजता नागाळी हिल्स, पणजी येथे ही घटना घडली. तक्रारदार सागर कदम (२१) यांच्या मित्रांचा चार कामगारांशी शाब्दिक वाद झाला.

त्यानंतर संशयितांनी सागर यांचा मित्र अंकित याच्या डोक्यावर धातूच्या कोयत्याने, तर डॅनियलच्या हातावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. संशयितांनी लाकडी डंडुक्यानीही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच सागर, अंकित आणि डॅनियल यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

संशयितांचा शोध घेण्यासाठी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, पणजी उपविभागीय पोलिस अधिकारी सुदेश नाईक आणि पणजी पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या देखरेखिखाळी विविध पथके तयार करण्यात आली होती. हल्ल्यात जखमी झालेले अंकित आणि डॅनियल यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT