माधवी दीक्षित pudhari photo
गोवा

Ramanand Sampradaya Goa | रामानंद संप्रदायातून राज्यात पहिले मरणोत्तर देहदान

Ramanand Sampradaya Goa | रामानंद संप्रदायातून राज्यात पहिले मरणोत्तर देहदान

पुढारी वृत्तसेवा

दाबोळी : रामानंद संप्रदायाच्या माध्यमातून राज्यात प्रथमच मरणोत्तर देहदानाची नोंद झाली असून वैद्यकीय शिक्षणासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. डिचोली येथील माधवी दीक्षित यांनी देहदानाचा संकल्प पूर्ण करत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. डिचोली-मानसरवाडा येथील माधवी दीक्षित (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह राज्यात असे देहदान करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या असून, सुमारे २०० पेक्षा अधिक मरणोत्तर देहदानाचे अर्ज संप्रदायाकडे प्रलंबित आहेत.

देहदान हे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणासाठी देण्यात आला. रामानंद संप्रदायातून संशोधन व प्रशिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मानवी शरीररचनेचा सखोल अभ्यास करता येतो तसेच उपचारपद्धतींचा अनुभव मिळतो.

रामानंद संप्रदायाच्या वतीने देहदान, अवयवदान आणि रक्तदान यांसारख्या सामाजिक उपक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत असून, जनजागृतीमुळे समाजात सकारात्मक बदल होत असल्याचे डॉ. कुडाळकर यांनी सांगितले. यावेळी त्यांची मुलगी बिजुरी दीक्षित, बहिणी इंदु चोडणकर, बबीता कवठणकर, सुचिता चोडणकर यांनी देह दानाची प्रक्रिया पूर्ण केली.

यावेळी गोवा उपपीठ जिल्हा अध्यक्ष सदानंद नाईक, विशांत कुडतरकर, नामदेव मालवणकर, विलास नाईक, जयदेव चोडणकर, प्रभाकर कवठणकर, सत्यवान चोडणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT