FDA seizure 130 kg Mawa file photo
गोवा

FDA seizure 130 kg Mawa | सणासुदीपूर्वी मडगावात FDA ची मोठी कारवाई! अस्वच्छ परिस्थितीतील 130 किलो खवा जप्त

FDA seizure 130 kg Mawa | गोव्यात येणाऱ्या बनावट अन्नाला चाप; अन्न व औषध प्रशासनाकडून 35 हजारांचा खवा नष्ट

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मडगाव - सालसेत येथे आज १३ ऑगस्ट रोजी पहाटे विशेष तपासणी मोहीम राबवून सुमारे ३५ हजारांचा १३० किलो खवा जप्त केला तसेच ३ दुग्धजन्य पदार्थ उत्पादन युनिट्समध्ये अस्वच्छता त्रुटी आढळून आल्याने त्यात सुधारणा करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

शेजारील राज्यांतून वाहनांद्वारे गोव्यात आणला जाणारा खवा तथा मावा, पनीर, दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ, तसेच गोव्यातील उत्पादन युनिट्सची तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान ६ उत्पादन युनिट्सची तपासणी करण्यात आली.

त्यापैकी ३ युनिट्समध्ये अस्वच्छ परिस्थितीत उत्पादन सुरू असल्याचे आढळून आले. संबंधित युनिट्सना त्रुटींची नोंद असलेले तपासणी अहवाल देण्यात आले असून, आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तपासणीदरम्यान १३० किलो खवा जप्त करून ताब्यात घेण्यात आला. त्याची अंदाजं किंमत ३५ हजार रुपये आहे.

हा खवा भाजीपाला, खत आणि इतर कच्च्या अन्नासोबत एकाच वाहनातून वाहतूक करण्यात येत होता. तसेच त्याची साठवणूक योग्य पद्धतीने आणि आवश्यक तापमानात करण्यात आली नसल्याचे आढळले. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोका लक्षात घेऊन हा संपूर्ण साठा नष्ट करण्यात आला.
मडगावमधील माडेल परिसरातील एका समोसा उत्पादन युनिटचीही तपासणी करण्यात आली. हे युनिट वैध अन्न परवान्याशिवाय सुरू असल्याचे आढळले. त्यामुळे संबंधित खाद्य व्यवसाय चालकाला वैध अन्न परवाना मिळेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. यानंतर मडगाव कदंब बसस्थानकातील दोन रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली. दोन्ही ठिकाणी अस्वच्छ परिस्थितीत व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्याने तपासणी अहवाल देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT