FDA Seizes 20 Kg Paneer  
गोवा

FDA Seizes 20 Kg Paneer | सासष्टीत एफडीएकडून २० किलो पनीर जप्त

FDA Seizes 20 Kg Paneer-धडक मोहीम : पुरवठादाराला ३० हजारांचा दंड

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : सासष्टी तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राबविलेल्या धडक तपासणी मोहिमेत परवान्याविना व विनालेबलचे दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या एका पुरवठादाराकडून सुमारे १० हजार किमतीचे २० किलो पनीर जप्त करण्यात आले. तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित पुरवठादारावर ३० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सासष्टी जप्त करण्यात आलेले पनीर.

याशिवाय रुमडामळ परिसरातील सात खाद्य आस्थापनांवरही कारवाई करून दंड आकारण्यात आला. अन्न आणि औषध प्राधिकरणाच्या या कारवाईमुळे नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दक्षिण गोवा अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने - सासष्टी तालुक्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या पुरवठादारांची तपासणी केली.

त्यावेळी एका पुरवठादाराकडे वैध अन्न परवाना नसल्याचे तसेच विक्रीसाठी ठेवलेल्या पनीरवर आवश्यक माहितीचे लेबल नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधिताविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कारवाई करून ३० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच २० किलो पनीर जप्त करण्यात आले. दुधाचे नमुनेही संकलित करून गुणवत्तेच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, रुमडामळ परिसरातील सात खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यापैकी पाच आस्थापने आवश्यक परवान्याशिवाय सुरू असल्याचे, तर दोन आस्थापने अस्वच्छ परिस्थितीत सुरू असल्याचे आढळून आले. या सर्वांवर मिळून १४ हजारांचा दंड आकारण्यात आला.

तपासणीदरम्यान संबंधित व्यावसायिकांना वापरलेले खाद्यतेल योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर टाळणे, स्वच्छता राखणे आणि वैध परवाना घेऊनच व्यवसाय करणे, अशा सूचना देण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT