Raw Chicken Storage 
गोवा

FDA Goa Chicken Seizure | विनापरवाना, अस्वच्छ 1,470 किलो चिकन जप्त

FDA Goa Chicken Seizure | एफडीएची मडगाव परिसर कारवाई; उत्तर गोव्यातही तपासणी मोहीम

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर तपासणी मोहीम तीव्र केली आहे. शनिवारी मडगाव-सासष्टी परिसरात केलेल्या कारवाईत योग्य साठवणूक व्यवस्था आणि आवश्यक कागदपात्रांशिवाय वाहतूक केलेले १,४७० किलो चिकन जप्त करून नष्ट करण्यात आले. या मांसाची एकूण किंमत ३ लाख ६७ हजार ५०० रुपये होती.

पहिल्या कारवाईत केई ६३ ए ७०१६ क्रमांकाच्या उघड्या वाहनातून योग्य साठवणूक व्यवस्था, लेबल, बिल आणि एफएसएसएआय परवान्याशिवाय वाहतूक केलेले ७०० किलो चिकन आढळले. त्याची किंमत १ लाख ७५ हजार रुपये होती. दुसऱ्या कारवाईत नावेली येथे जीए ०८ व्ही ७४२१ क्रमांकाच्या रिक्षातून दिल्लीहून रेल्वेने मडगावात आणलेले ७७० किलो चिकन आढळले.

योग्य साठवणूक आणि लेबलिंग नसल्याने १ लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीचे चिकन जप्त करून नष्ट करण्यात आले. अन्य तीन वाहनांतील मांस योग्य इन्सुलेटेड स्थितीत आढळले.
ग्राहकाच्या तक्रारीनंतर केपे तालुक्यातील रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली.

नऊ आस्थापनांमध्ये अन्नात अतिरिक्त रंग वापरणे, आरोग्य कार्ड व कीटकमंत्रण नोंदीचा अभाव, अस्वच्छता, योग्य पोशाख नसणे आणि माशांपासून संरक्षणाची व्यवस्था नसणे अशा त्रुटी आढळल्या. एका आस्थापनाला अन्न सुरक्षा कायदा २००६ च्या कलम ३१(२) अंतर्गत विनापरवाना नोटिस देण्यात आली, तर अस्वच्छतेबद्दल ७ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. संबंधित व्यावसायिकांना त्रुटी दूर करण्याचे निर्देशही देण्यात आले.

खाद्य व्यवसायांची तपासणी

वेर्णा औद्योगिक वसाहतीतील उच्च जोखमीच्या श्रेणीतील एका आस्थापनतही आवश्यक सुविधांचा अभाव आढळला. बार्देश तालुक्यात करसवाडा जंक्शन आणि थिविम रेलवे स्थानक मार्गावरील २६ खाद्य व्यवसायांची तपासणी करण्यात आली. स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा आस्थापनांना परवाना मिळेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याच्या नोटिस बजावण्यात आल्या.
पोशाख नसणे आणि माशांपासून संरक्षणाची व्यवस्था नसणे अशा त्रुटी आढळल्या. मडगाव परिसरातील कारवाईत दक्षिण गोव्याचे अधिकारी संयोत कुडलकर, माधव कवळेकर, अमरदीप गावडे, गौरेश गोवेकर आणि डोमिंग्स गोन्सालविस सहभागी झाले. केपे येथील कारवाईत कुडलकर, केन कावर्हालो आणि स्नेहा नाईक, तर राज्यभरातील तपासणीत एफडीए संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अमित मांड्रेकर, डार्लेन दिवकर, राम धुरी, प्रतीक्षा चोपडेकर आणि साईनाथ चारी यांच्या पथकाने सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT