Sambhajinagar News : जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षक शिंदेंना अतिरिक्त वेतनवाढ द्या ! File Photo
गोवा

Goa POCSO Case | मुलीवरील बलात्कार प्रकरणी बापाला 20 वर्षे सक्तमजुरी

Nashik POCSO Case | आरोपीने केलेले गुन्हे अत्यंत घृणास्पद असून समाजाला काळिमा फासणारा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने निवाड्यात केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुरगाव येथील स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी पित्याला पणजी जलदगती विशेष न्यायालयाने (पोक्सो) दोषी ठरवून २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपीने केलेले गुन्हे अत्यंत घृणास्पद असून समाजाला काळिमा फासणारा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने निवाड्यात केले आहे.

न्यायालयाने आरोपी वडिलांना बीएनएस कायद्याच्या कलम ६४ खाली २० वर्षांची शिक्षा व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याची साधा कारावास, पोक्सो कायद्याच्या कलम ४ अन्वये १० वर्षांची शिक्षा व २० हजार रुपये दंड व तो न भरल्यास १ महिन्याचा साधा कारावास, पोक्सो कलम ६ अन्वये २० वर्षांची शिक्षा व ५० हजार रुपये दंड व तो न भरल्यास १ महिन्याचा साधा कारावास, पोक्सो कलम ८ अन्वये ३ वर्षांची शिक्षा व १० हजार रुपये दंड व तो न भरल्यास १ महिन्याचा साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.

या सर्व शिक्षा एकाचवेळी भोगावयाच्या आहेत. आरोपीने दंडाची रक्कम जमा केल्यास ती पीडितेला नुकसानभरपाई म्हणून दिली जावी. आरोपी ज्या कालावधीत कोठडीत होता तो कालावधी शिक्षच्या कालावधीतून वजा करण्यात यावा, असे निवाड्यात न्यायालयाने नमूद केले आहे. आरोपीने स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर केलेल्या कृत्यामुळे समाजाच्या सदसदद्वेकबुद्धीला हादरवून सोडले आहे.

अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी पोक्सो कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद केली आहे. पीडितेला झालेल्या आघातामुळे तिच्या मनावर आयुष्यभरासाठी खोल जखम झाली आहे व कोणतीही शिक्षा किंवा नुकसानभरपाई तिला होणाऱ्या वेदनांची भरपाई करू शकणार नाही. अशा प्रकारचे गुन्हे खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट संकेत समाजाला देण्यासाठी अशी कठोर शिक्षा देणे गरजेचे असे निरीक्षण न्यायालयाने केले आहे.


आरोपी असलेल्या पित्याने रात्रीच्यावेळी झोपेत पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेच्या दुसऱ्या दिवशी शाळेत आलेली मुलगी रडत असल्याचे आढळून आल्यानंतर तिच्या शिक्षिकेने चौकशी केली. त्यावेळी तिने घडलेला प्रकार कथन केला. ही माहिती पोलिसांना देण्यात आल्यावर तिची जबानी नोंदवून पोलिसांनी वडिलांना अटक केली. सुनावणीवेळी शिक्षिका, वैद्यकीय डॉक्टर, तपास अधिकारी व साक्षीदारांसह १३ जणांच्या साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT