Except for Talgaon, close contests are possible elsewhere.
पणजी : पुढारी वृत्तसेवा
निवडणकीसाठी जिल्हा पंचायतीच्या तिसवाडी तालुक्यातील प्रचाराचा विचार करता ताळगाव जि.पं. मतदारसंघात विरोधकांचा प्रभाव दिसून आलेला नाही. खोली व चिंबलमध्ये भारतीय जनता पक्षाचा तर सांताक्रुझ व सेंट लॉरेन्समध्ये अनुक्रमे काँग्रेस व आरजीचा प्रभाव दिसून आला.
तिसवाडीमध्ये जिल्हा पंचायतीचे ५ मतदारसंघ येतात, यातील ताळगाव मतदारसंघांवर असलेली महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात व आमदार जेनीफर मोन्सेरात यांची पकड लक्षात घेता व प्रचारातील आघाडी पाहता, भाजपचे उमेदवार रघुवीर कुंकळकर यांचे पारडे जड दिसते. त्यांच्याविरोधात उभे राहिलेल्या आम आदमी पक्षाच्या दुर्गा सिल्वा आणि काँग्रेसचे विजू देवकर यांचा प्रचार परिणामकारी झालेला नाही.
चिंबल जि.पं. मतदारसंघात भाजपच्या गौरी प्रमोद कामत यांना चांगला प्रतिसाद दिसून आलाआमदार रुडाल्फ फर्नाडीस, माजी आमदार टोनी फर्नाडीस, जि.पं. सदस्य गिरीश उस्कैकर यांनी कामत यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतलेला आहे. त्यांच्या विरोधात आरजीच्या दिपीका काणकोणकर, आपच्या मारिया आंताव आणि काँग्रेसच्या सेजल कळंगुटकर उभ्या असून येथे कामत व आहे. सांताक्रूझ जि.पं. मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या विद्यमान सदस्य व आताच्या उमेदवार शायनी ओलिव्हेरा यांना संधी दिसते.
त्यांना भाजपच्या उमेदवार सोनिया नाईक टक्कर देत आहेत. येथे आपच्या उमेदवार राजश्री च्यारी व आरजी पक्षाच्या उमेदवार इस्पेरांका ब्रागांझा आहेत. येथे शक्य दिसते. चारही पक्षांनी येथे जोरदार प्रयत्न चालवले असल्यामुळे सांताक्रुज मध्ये नेमका कोणाचा विजय होईल हे भाजप व काँग्रेस यांच्याक जोरदार लढतं सध्या तरी सांगता येत नाही.
आमदार वीरेश बोरकर यांची प्रतिष्ठा पणाला
तिसवाडीतील सेंट लॉरेन्स जिल्हा पंचायत मतदारंसच हा सांत आंद्रे गोव्यामध्ये आरजी पक्षाचा एकमेव आमदार विरेश बोरकर हे २०२२ मध्ये याच मतदारसंघातून केवळ जिंकले होते, त्यामुळे जि.पं. निवडणुकीत आमदार बोरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आरजीच्या उमेदवार तृप्ती बकाल यांना निवडून आणण्यासाठी बोरकर यांनी बराच घाम गाळला. दुसरीकडे २०२२ च्या निवडणुकीत अवघ्या ७० मतांनी पराभूत झालेले भाजपचे उमेदवार व माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी भाजपच्या उमेदवार पावलिना ऑलिवेरा यांना निवडून आणण्यासाठी बरेच परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या जोडीला जिल्हा पंचायत अध्यक्ष धाकू मडकईकर यांनीही भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे येथे भाजपा विरुद्ध आरजी असा जोरदार सामना पक्षाच्या प्रतिमा शिरोडकर आणि काँग्रेसच्या उज्ज्वला नाईक आदी उमेदवार आहेत.