Vinod Palyekar Case 
गोवा

Vinod Palyekar Case | तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून माजी मंत्र्यांकडून लैंगिक अत्याचार

Vinod Palyekar Case | मूळ उत्तर प्रदेशच्या एका तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर कथित शारीरिक, लैंगिक अत्याचार व वैयक्तिक फसवणूक केल्याप्रकरणी शिवोलीचे माजी आमदार व माजी मंत्री विनोद पालयेकर यांच्याविरुद्ध म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मूळ उत्तर प्रदेशच्या एका तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर कथित शारीरिक, लैंगिक अत्याचार व वैयक्तिक फसवणूक केल्याप्रकरणी शिवोलीचे माजी आमदार व माजी मंत्री विनोद पालयेकर यांच्याविरुद्ध म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लैंगिक तसेच फसवणुकीची घटना ही २०१९ ते २०२६ च्या काळात घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. त्यांना चौकशीसाठी लवकरच कायदेशीर समन्स बजावण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत ती संशयित विनोद पालयेकर यांच्या घरी कामाला होती. या काळात त्यांनी लैंगिक अत्याचार व शोषण केल्याचा आरोप केला आहे. नोकरी देण्याचे आमिष दाखवून वैयक्तिक फसवणूक केली.

पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ६९, ७५ (२) व ३१८ (४) खाली गुन्हा नोंद केला आहे. पीडित तरुणीची दंडाधिकाऱ्यांसमोर जबानी नोंदवण्यासंदर्भात पोलिस विचार करत आहेत. लैंगिक शोषणाच्या घटना विविध ठिकाणी घडल्या असल्याने पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी सध्या २३ वर्षांची असून, तिच्यावर झालेला लैंगिक अत्याचार सहा वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे ती त्यावेळी अल्पवयीन होती का या दृष्टीने पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. तसे झाल्यास संशयित विनोद पालयेकर यांच्याविरुद्ध बाल कायद्याखालील कलमांचा समावेश होऊ शकतो. विनोद पालयेकर हे २०१७ ते २०२२ या काळात गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार होते. ही घटना त्याच काळात मंत्री असताना घडली आहे.

माजी मंत्र्यांमध्ये खळबळ

उत्तर गोव्यातील माजी मंत्र्यांविरुद्ध कथित लैंगिक अत्याचाराचा गुन्हा पोलिसांत दाखल झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी गोवाभर पसरताच एकच खळबळ उडाली. अनेकांनी सुरुवातीला उत्तर गोव्यातील इतर दोन माजी मंत्र्यांच्या नावाचा तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली.

हे माजी मंत्रीही गोंधळून गेले. मात्र अखेर तो माजी मंत्री विनोद पालयेकर असल्याचे उघड होताच त्यांनी सुस्कारा सोडला. हायप्रोफाईलमुळे गुन्ह्याची गुप्तता : पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिली होती. त्याच्या प्राथमिक चौकशीसाठी माजी आमदाराला चौकशीस बोलावून त्यांना हे प्रकरण मिटवण्याची संधी देण्यात आली होती.

हे हायप्रोफाईल प्रकरण असल्याने कित्येक दिवस या प्रकरणात गुप्तता पाळण्यात आली होती. तसे आदेश वरिष्ठ पोलिसांनी म्हापसा पोलिस प्रमुखांना दिले होते. पीडितेने हे प्रकरण मिटवण्यासाठी जो डिमांड केला होता तो मात्र पालयेकर यांना मान्य नसल्याने अखेर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची जोरदार चर्चा उत्तर गोव्यात सुरू आहे.

पोलिसांकडून स्वतंत्र चौकशी :

मुख्यमंत्री माजी जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी उत्तर प्रदेशातील २३ वर्षीय तरुणीवर केलेल्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाची पोलिस स्वतंत्र चौकशी करत आहेत. नोकरी देण्याच्या बहाण्याने लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT