elephant file photo
गोवा

Onkar Elephant Sindhudurg | ओंकार हत्तीवर मशाली आणि बॉम्बफेक करणाऱ्यांवर कारवाई करा; पर्यावरणप्रेमींचा उपवनसंरक्षकांना अल्टीमेटम

Onkar Elephant Sindhudurg | ओंकार प्रकरणी संबंधितांवर कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा आणि सिंधुदुर्ग वन विभागाकडून ओंकार हत्तीवर बाण, मशाली फेकण्याच्या घटना उघड झाल्या आहेत. याबद्दल पर्यावरण प्रेमींनी उपवनसंरक्षकांकडे तक्रार केली आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

ओंकार हत्तीला वनतारात नेण्यासाठी सिंधुदुर्गातील राजकीय नेते, जनप्रतिनिधी पहिल्यापासून प्रयत्नशील होते. पेढणे तालुक्यातील काहीं गावात ओंकारचा वावर असल्याने येथील स्थानिक शेतकरी, राजकीय पदाधिकारीारी ओंकारला वनतारात नेण्याची मागणी वनमंत्री विश्वजित राणे यांच्याकडे करीत आहेत.

मात्र, पर्यावरणप्रेमी न्यायालयात गेल्याने त्या सर्वांचा ओंकारला वनतारात नेण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. त्यामुळे ओंकार आक्रमक आहे, तो माणसांवर हल्ला करतो हे दाखवण्यासाठी वन कर्मचारी आणि हाकारे ओंकारला आक्रमक बनवण्यासाठी त्याच्यावर ॲटम (सुतळी) बॉम्ब, फटाक्यातील अग्निबाण, मशाली फेकत आहेत.

त्याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध झाले असून, असे प्रकार कर्मचारी स्वतःहून करतात की, जाणूनबुजून मशाली फेक्या जातात, त्याला इजा किंवा जखमा होऊन तो हिंस बनेला असा प्रयत्न केला जातो. ज्यावेळी त्याला जखमी केले गेले, तेव्हा त्याने माणसांना लक्ष्य न करता वाहनांना लक्ष्य केले. तो माणसांच्या गर्दीत वावरत असल्याने त्याने माणसांवर हल्ला केला नसला, तरी अशाप्रकारचे त्याला वारंवार त्रास दिला गेलाच तर माणसांवरही हल्ला करू शकतो.

कारण तो वन्य हत्ती आहे, प्रशिक्षित नाही. अर्थात काही जणांकडून मशाली फेकल्या जातात, त्याला इजा किंवा जखमा होऊन तो हिंस्त्र बनेला असा प्रयत्न केला जातो. पर्यावरणप्रेमींनी सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा आणि साहाय्यक उपवनसंरक्षक वैभव बोराटे यांच्याकडे संशय व्यक्त केला आहे. ओंकार माणसांच्या गर्दीत राहतो.

तो कुणावर हल्ला करीत नाही. त्याला खाऊचे आमिष दाखवून सहजपणे वस्तीपासून दूर नेले जाते. याबाबतचे व्हिडिओ सगळ्यांनी पाहिले असतील. मात्र, त्याच्यावर रात्रीच्या वेळी परिस्थीतिजन्य पुरावे पर्यावरणप्रेमींनी उपवनसंरक्षक, सहायक उपवनसंरक्षक यांना दिले आहेत.

संबंधितांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवावे; अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. या शिष्टमंडळात पर्यावरणप्रेमी संजय सावंत, मंदार गावde यांच्यासह अनेकजण होते. प्रसिद्ध अभिनेते व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनीही शिष्टमंडळासोबत वनाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

ओंकारला कळपापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

ओंकारला ड्राईव्ह करून तिलारी खोऱ्यातील कळपाकडे नेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. मात्र, काही हाकारे त्याला आपल्या गावातून कळपाकडे जाऊ न देता परत माघारी पाठवत आहेत. सध्या चार हत्तींचा कळप बांबर्डे परिसरात मुक्कामाला असून ओंकार तिथे पोहोचल्यावर पूर्ण कळप चंदगड तालुक्यात बाहुबलीकडे जाण्याची व तेथून कर्नाटकात जाण्याची शक्यता आहे.

ओंकार प्रौढावस्थाकेत जात असल्याने बाहुबली व मोठ्या मादीकडून ओंकारला कर्नाटकातील कळपात पाठवण्याची शक्यता व्यक्त करीत आहेत. वनाधिकारी, वन कर्मचारी आणि हाकार्यांना हेच हवे आहे, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. शर्मा आणि बोराटे यांच्याकडे शिष्टमंडळाने हत्ती गस्तीवर असलेल्या काही वन अधिकाऱ्यांची आणि हाकार्यांची नावे दिली आहेत. विशेष म्हणजे काही विशिष्ट वनाधिकारी आणि हाकारे ड्युटीवर असताना त्याला इजा पोहोचवून हिंस बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप असून त्याबाबतचे व्हिज्युअल्स आणि परिस्थितीजन्य पुरावे पर्यावरणप्रेमींनी दिले आहेत.

हुल्ला टीमकडील प्रशिक्षणाचा गैरवापर

मानवी वस्तीकडे आलेल्या वन्य हत्तींना मशालीचा धाय दाखवून कसे दूर ठेवायचे. एखादा हत्ती अंगावर आला तरच मशाली त्याच्या दिशेने फेकायचे असे प्रशिक्षण पश्चिम बंगालमधून आलेल्या प्रशिक्षित हुल्ला टीमने सिंधुदुर्गातील हाकारे व वन कर्मचाऱ्यांना दिले आहे. मात्र, ओंकारसारख्या गर्दीत मिसळणाऱ्या व आक्रमक न होणाऱ्या शांत हत्तीवर जाणीवपूर्वक काहीजण मशाली फेकून त्याला जखमी करीत आहेत, याची दखल घेण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT