Goa Police File Photo
गोवा

Engineers and lawyers competing for police constable posts - पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी अभियंता, वकीलही स्पर्धेत

पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी अभियंता, वकीलही स्पर्धेत

पुढारी वृत्तसेवा

पणजी : गोव्यात पोलिस कॉन्स्टेबल पदांसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळत असून, ४७९ रिक्त जागांसाठी तब्बल २४,५०० हुन अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. एका पदासाठी सरासरी ५१ उमेदवार स्पर्धेत आहेत. त्यामध्ये अभियंता व वकीलांचाही समावेश आहे.

बारावी परीक्षा उत्तीर्णतची पात्रता असली तरी अर्ज करणाऱ्यांमध्ये उत्त्व शिक्षित उमेदवार आहेत. त्यामध्ये विविध शाखेचे पदवीधर व पदव्युत्तर, पदविका व पदवी अभियंते, वकील आहेत. सरकारी नोकरीच्या हव्यासापोटी शिक्षणाला मौल नाही असेच यावरून दिसून येत आहे.

सरकारी सेवेत व खासगी कंपनीत मिळणाऱ्या वेतनात जमीन अस्मानाचा फरक तसेच सुरक्षितता असल्याने उमेदवारांची मोठी उपस्थिती जाणवत आहे. गोवा कर्मचारी निवड आयोगाने जाहीर केलेल्या या भरती प्रक्रियेअंतर्गत पहिली संगणक आधारित भरती परीक्षा (सीबीआरटी) याच आठवड्यात घेण्यात येणार आहे. या परीक्षेनंतर पुढील टप्प्यासाठी उमेदवारांची निवड केली जाईल. भरती प्रक्रियेत ३६० पुरुष कॉन्स्टेबल, ११९ महिला कॉन्स्टेबल, १११ पोलिस चालक (ग्रेड-३), ६० वॉर्डन, २३ राउंड फॉरेस्टर, १३ रेंज फॉरेस्ट ऑफिसर आणि ९ वनरक्षक पदांचा समावेश आहे.

राज्यातील ४४ पोलिस ठाण्यांपैकी बहुतांश ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता असल्याचे समोर आले आहे. राज्यभरात सुमारे १५७ पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पर्दाची कमतरता असून, पणजी, पेडणे आणि आगशी भागात सर्वाधिक कर्मचारी तुटवडा असल्याची माहिती यापूर्वी वेळोवेळी विधानसमेत प्रश्नोत्तरामधून उघड झालेली आहे. गोवा पोलिस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम सरकारच्या मोठ्या उपक्रमांपैकी एक मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT