ED Raids at Six Locations in Goa pudhari
गोवा

ED Raids at Six Locations in Goa| गोव्यात ईडीचे सहा ठिकाणी छापे

६७.५० लाखांची रोकड, कागदपत्रे व डिजिटल उपकरणे जप्त

पुढारी वृत्तसेवा

पणजी : बहुबँक कर्ज फसवणूक प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गोव्यातील मे. क्राऊन मिनरल ट्रेडिंग कॉर्पोरेशनशी (सीएमसी) संबंधित गोव्यात सहा ठिकाणी छापेमारी करून ६७.५० लाखांची रोकड, मालमत्तेची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. कॅनरा बँकेने दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणाची सुरुवात झाली होती.

तक्रारीनुसार, संबंधित कंपनीने मडगाव शाखेतून ७ कोटी रुपयांचे कर्ज फसवणूक करून घेतले होते. नंतर हे कर्ज खाते थकीत होऊन एनपीए (नॉन-परफॉर्मिंग अॅसेट) मध्ये परिवर्तित झाले भसन बँकेची ६१९ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

ईडीच्या माहितीनुसार, कच्च्या लोखंड धातूच्या व्यापारात कार्यरत असल्याचा दावा करणाऱ्या या कंपनीचे प्रत्यक्षात कोणतेही खरे व्यावसायिक व्यवहार नव्हते. तपासादरम्यान आरोपींनी एकाच मालमत्तांवर एकाचवेळी विविध बँकांकडून कर्ज मिळवल्याचे उघड झाले आहे. यात मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सेंट्रल बैंक ऑफ इंडिया, इंडियन बँक, कर्नाटक बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचा समावेश असन १० कोटी रुपयांहन अधिक कर्ज उचलल्याचा आरोप आहे.

तसेच, एकाच मालमत्तेसाठी बनावट विक्री कागदपत्रे तयार करून ती विविध बँकांना सादर करण्यात आल्याचा आरोपही ईडीने केला आहे. या माध्यमातून गुन्ह्यातील पैशांचा मागोवा लपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

यापूर्वीही ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) कायद्यांतर्गत संबंधित भागीदारांच्या २.८६ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. दरम्यान, २०२२ मध्ये सीबीआयनेही राष्ट्रीयीकृत बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT