पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जिवा मायन्स अँड मिनरल्स लिमिटेड कंपनीविरोधात कारवाई करत २.२९ कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.
ईडीने केलेल केलेल्या या कारवाईत सावंतवाडी येथील गालेल परिसरातील दोन भूखंड आणि मुंबई येथील एक निवासी फ्लॅट यांचा समावेश आहे. ही कारवाई गोवा ईडीकडून मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदाअंतर्गत करण्यात आली आहे.
ईडीच्या माहितीनुसार, ही जप्ती २०२० साली मे. लाओ टिंग डाडी मोबाईल कॉम्पोनेंट्स कंपनीशी संबंधित कथित फसवणूक प्रकरणाशी जोडलेली असून, या व्यवहारांची रक्कम सुमारे १३.४२ कोटींची असून पुढील तपास सुरू आहे.