Goa Tourism Season 
गोवा

Goa Tourism Season | दसरा-दिवाळीत येणार पर्यटनारा तेजी

Goa Tourism Season | बहुतांश बीच शॅक्स सुरू : पर्यटन हंगामाची जय्यत तयारी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
दसरा आणि दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील पर्यटन हंगामाला वेग घेण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील सुट्ट्यांसाठी गोव्याचा शोध घेणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ४३ टक्क्के वाढ झाल्याची माहिती अगोडाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

किनारपट्टीवरील बहुतांश बीच शॅक्स सुरू झाले असून, हवाई आणि रस्ते वाहतुकीतील सुधारित सुविधांमुळे पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. २० ऑक्टोबर रोजी दशहरा आणि नोव्हेंबरच्या सुरवातीला दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने कुटुंबासह पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

हॉटेल्स, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स, बीच शॅक्स आणि पर्यटन व्यवसायिकांनी पर्यटकांच्या स्वागताची तयारी केली आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे होमस्टे, टॅक्सीचालक, स्थानिक मार्गदर्शक, कारागीर आणि इतर व्यवसायिकांनाही फायदा होण्याचा अपेक्षा आहे.

दाबोळी आणि मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळांमुळे गोव्याची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटी सुधरत आहे. अकासा एअरने डिसेंबरपासून चंदीगड-गोवा थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली असून, हिवाळी वेळापत्रकात विमानफेऱ्या वाढण्याची अपेक्षा आहे.

वन्यजीव संवर्धक आणि मृगाया एक्सपेडिशन्सचे संस्थापक परशु रांगणेकर यांनी पक्षीनिरीक्षण, जंगलभ्रमंती, पाणथळ प्रदेशांत वन्यजीव आणि स्थानिक गावांचा अनुभव पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकतो, असे नमूद केले.

ग्रामीण पर्यटनाचा अनुभव घ्या : नाईक

पर्यटन संचालक केदार नाईक यांनी पर्यटकांची सुरक्षितता, जबाबदार पर्यटन आणि उत्तम सुविधा यांवर भर दिला. समुद्रकिनाऱ्यांबरोबरच जुने गोवे, मसाल्यांच्या बाग्या, नदीपर्यटन, निसर्गभ्रमंती आणि ग्रामीण पर्यटनाचा अनुभव घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

बीच शॅक्स ओनर्स वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष क्रूझ कार्डोझ यांनी बहुतांश बीच शॅक्स सुरू झाल्याचे सांगितले. पर्यटकांनी गोव्याच्या संस्कृतीचा आदर राखावा, कायद्याचे पालन करावे आणि समुद्रकिनारे स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT