Drug Case  Pudhari
गोवा

Goa Drug Case | ड्रग्ज माफिया अटालाचा जामीन अर्ज फेटाळला; गोवा सत्र न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Goa Drug Case | ड्रग्ज माफिया अटालाला जामीन फेटाळला

पुढारी वृत्तसेवा

गोवा : अमली पदार्थ प्रकरणात अडचणीत आलेल्या इस्रायली नागरिक यानिव बेनाईम उर्फ अटाला याचा जामीन अर्ज आज शुक्रवारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावत त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट केले. सुनावणीवेळी तो न्यायालयात अनुपस्थित असल्याची नोंदही न्यायालयाने केली. त्याला न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी २४ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.

जवळपास वर्षभरापूर्वी अटाला याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, १४ जुलै २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्याचा जामीन रद्द केला होता. कनिष्ठ न्यायालयाने जामीन देताना नोंदवलेले काही निष्कर्ष कायद्याच्या दृष्टीने टिकणारे नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले होते. दरम्यान, एप्रिल २०२५ मध्ये एनसीबीने शिवोली येथील अटाला याच्या फ्लॅटवर छापा टाकला होता. या कारवाईत सुमारे ८.७ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केल्याचा आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT