पणजी : पुढारी वृत्तसेवा
येथील दिवजा सर्कलजवळ सोमवारी रात्री तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. त्यात दोन कार, तर एका दुचाकीचा समावेश आहे. भरधाव वेगाने आलेल्या महागड्या कारची समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारला उजव्या बाजूने जोरदार धडक बसली.
यात दोन्ही कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. तसेच दोन्ही कारचे पुढील उजव्या बाजूचे टायर तुटून पडले एका होते. या अपघातात दुचाकीस्वाराचा नाहक अपघात झाला. त्याच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. भरधाव वेगाने आलेल्या महागड्या कारमध्ये दोघे प्रवासी होते. अपघातानंतर एअर बॅग उघडल्याने त्यांना दुखापत झाली नाही. मात्र, दुसरी कार आणि दुचाकीस्वार यांना दुखापत झाली. जखमींना बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले.