भूषण आरोसकर
पणजी : बिंदूसागर हे फक्त एक नाव नाही; तर लाखो ओडिया लोकांसाठी ती एक जपलेली भावना आहे. ही भावनाच या चित्रपटाचे अस्तित्व आहे. बिंदूसागर जीवनाचे वर्तुळ प्रतिबिंबित करते. त्यात एक अद्वितीय ऊर्जा आहे; ज्याशी प्रत्येक ओडिया हृदय सहजपणे जोडले जाते, असे प्रतिपादन बिंदूसागर चि त्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक स्वैन यांनी केले.
56 व्या इफ्फी महोत्सवात आयोजित पत्रकार परिषदेत क्रूसह माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ओडिया प्रेक्षकांसाठी ओडिया चित्रपट तयार करणे एक आव्हानात्मक होते. चित्रपटाचे निर्माता शिलादित्य बोरा हे बिंदूसागर या संकल्पनेशी आणि शीर्षकाशी सकारात्मक झाले, असे स्वैन म्हणाले. बिंदूसागर ही कथा आकर्षक, व्यावसायिक आणि हृदयस्पर्शी पद्धतीने पडद्यावर आणल्याबद्दल स्वैन यांनी समाधान व्यक्त केले. चित्रपटातून ओडिसाची कला, संस्कृती आणि समृद्ध वारसा समोर आणण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केल्याचा विश्वास यावेळी चित्रपटाचे निर्माता शिलादित्य बोरा यांनी व्यक्त केला. बोरा म्हणाले, अभिषेकने सुरुवातीला मला हिंदी चित्रपट बनवण्यासाठी संपर्क साधला. मी त्यांना फक्त विचारले, ‘तू ओडिशाचा आहेस, तिथले लोक तुला ओळखतात तर ओडिया चित्रपट का बनवू नये, असे त्याला मी विचारले. चित्रपटाशी प्रत्येक ओडिया माणूस जोडला जाऊ शकेल, असा चित्रपट मला बनवायचा होता मग तो ओडिशातील कामगार वर्गातील व्यक्ती असो किंवा नासामध्ये काम करणारा ओडिया व्यावसायिक असो.
बिंदूसागर हा एक काळजीपूर्वक डिझाइन केलेला चित्रपट आहे, जो आपल्या प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करण्याच्या उद्देशाने बनवला गेला आहे. मला हा चित्रपट ओडिशाच्या प्रत्येक कानाकोपर्यात पोहोचवायचा होता. आमच्या चित्रपटात आठ गाणी आहेत. प्रत्येक गाणे कथाकथनात नैसर्गिकरित्या मिसळते. बिंदूसागर हा एक अतिशय संगीतमय चित्रपट देखील आहे. अभिनेत्री प्रकृती मिश्रा म्हणाल्या, एक कलाकार म्हणून, अर्थपूर्ण पात्र मिळणे नेहमीच आनंददायी असते. एक महिला अभिनेत्री म्हणून, आपल्याला क्वचितच अशा भूमिका मिळतात ज्या आपल्याला खरोखरच आपली कला दाखवू देतात. बिंदूसागर माझ्यासाठी मोठी संधी होती.
अभिनेत्री प्रकृती मिश्रा अभिनेते दीपानित दासमोहापात्रा यांनी सांगितले की, ‘मी स्वतःला दिग्दर्शकाचा अभिनेता मानतो कारण शेवटी, आपण दिग्दर्शकाच्या द़ृष्टीला जिवंत करत आहोत आणि आपण सर्वजण त्या मोठ्या चित्राचे फक्त एक भाग आहोत. अभिषेक भाई दिग्दर्शक म्हणून अविश्वसनीयपणे आणि स्पष्ट विचारसरणीचे आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया आणखी परिपूर्ण झाली. हा चित्रपट ओडिशाच्या संस्कृती, परंपरा, अन्न, भावना हे प्रत्येक टप्प्यावर दाखवण्याचा प्रयत्न करतो.
दिग्दर्शक स्वेन म्हणाले, ओडिशाच्या सर्वोत्तम कलाकारांपैकी एक आणि अत्यंत लोकप्रिय गायक दिवंगत हुमेन सागर यांचे अवघ्या दहा दिवसांपूर्वी निधन झाले आणि त्यांचे शेवटचे गाणे या चित्रपटात आहे. म्हणून दिग्दर्शकाने त्यांच्या स्मृतीला चित्रपटाला आदरांजली वाहिली.