गोवा

Theatre Actress Goa | संकटांवर मात करत रंगभूमी गाजवणारी दीपेक्षा गावकर; जिद्द अन् अभिनयाची अनोखी कथा

Theatre Actress Goa | कोकणी ते मराठी रंगभूमी! अभिनेत्री दीपेक्षा गावकरचा थक्क करणारा नाट्यप्रवास

पुढारी वृत्तसेवा

रंगभूमीवर कलाकाराचा सहजसुंदर अभिनय पाहताना प्रेक्षक टाळ्यांचा वर्षाव करतात; परंतु त्या टाळ्यांमागे असणारी मेहनत, संवाद पाठ करण्यासाठी घालवलेल्या रात्री, पहिल्या प्रयोगाची धकधुक आणि स्वतःमधील भीतीशी केलेला संघर्ष क्वचितच कुणाच्या लक्षात येतो. अशाच संघर्षातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी उद्योन्मुख स्त्री नाट्यकलाकार म्हणजे दीपेक्षा गावकर.

बालपणी नृत्याची आवड जोपासणाऱ्या या कलाकाराने पुढे अभिनयाच्या रंगभूमीवर पाऊल ठेवत आपल्यातील कलागुणांना नवे आकाश मिळवून दिले. वडील देविदास गावकर आणि आई देवयानी गावकर यांच्या संस्कारक्षम वातावरणात तिची जडणघडण झाली.

कुटुंबीयांनी तिच्यातील कलागुण ओळखून तिला सतत प्रोत्साहन दिले. शिक्षण आणि कला या दोन्ही क्षेत्रांचा समतोल राखत त्याने आपली वाटचाल सुरू ठेवली. कुटुंबीयांचा विश्वास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सहकलाकारांची साथ हे तिच्या यशाचे आधारस्तंभ ठरले.

महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केल्यानंतर तिच्या कलाप्रवासाला निर्णायक वळण मिळाले. नाटकासाठी कलाकारांची निवड सुरू असताना तिला भूमिका करण्याची संधी देण्यात आली. नाट्यक्षेत्राचा पूर्वानुभव नसल्याने प्रथम त्याने काहीसा संकोच व्यक्त केला; मात्र मित्रमैत्रिणी आणि सहकलाकारांनी दिलेल्या धीरामुळे त्याने ही संधी स्वीकारली.

अखेर त्याने नाटकाच्या तालमींमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि तिथूनच तिच्या अभिनयप्रवासाची खरी सुरुवात झाली. प्रयोग संपल्यानंतर सहकलाकारांनी तिच्या प्रयत्नांचे कौतुक केले. पहिलाच प्रयोग असल्याने झालेल्या चुका समजावून सांगत पुढील प्रयोगात अधिक आत्मविश्वासाने काम करण्याचा सल्ला दिला.

त्या कौतुकाने तिला नवी ऊर्जा मिळाली. पहिल्या प्रयोगातील अनुभवातून शिकत त्याने आपल्या अभिनयातील त्रुटींवर काम केले. संवादफेक, रंगमंचावरील हालचाली, चेहऱ्यावरील भाव आणि भूमिकेची भावनिक बाजू यांचा पुन्हा सराव केला. त्यामुळे दुसरा प्रयोग पहिल्यापेक्षा अधिक प्रभावी ठरला. या अनुभवामुळे तिच्या अभिनयात सहजता आली.

त्यानंतर त्याने सामाजिक, गंभीर आणि भावनिक आशय असलेल्या नाटकांकडे वाटचाल केली. कोकणी आणि मराठी भाषेतील नाटकांमध्ये काम करताना त्याने विविध व्यक्तिरेखा साकारल्या. व्यावसायिक नाटकांबरोबरच ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील नाट्यकृतींमध्येही त्याने आपली अभिनयक्षमता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

प्रत्येक भूमिका तिच्यासाठी नवा अनुभव ठरली. एखाद्या व्यक्तिरेखेचे बोलणे, चालणे, विचार करण्याची पद्धत आणि तिच्या मनातील भावविश्व यांचा अभ्यास करूनच ती भूमिका रंगमंचावर साकारण्यावर तिचा भर राहिला. महाविद्यालयीन आणि खुल्या नाट्यस्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळे तिच्या अभिनयाला अधिक धार मिळाली.

स्पर्धात्मक वातावरणात काम करताना वेळेचे नियोजन, शिस्त, संघभावना आणि दिग्दर्शकीय सूचना स्वीकारण्याची वृत्ती विकसित झाली. विविध नाट्यप्रयोगांतून तिच्या अभिनयाची दखल घेतली जाऊ लागली. सुरवातीला भूमिका मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या कलाकाराला पुढे नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी निमंत्रणे येऊ लागली. हीच तिच्या परिश्रमांची खरी पावती होती. रंगभूमीवरील प्रत्येक प्रयोगाने तिच्या अनुभवात भर घातली आणि नव्या भूमिका स्वीकारण्याचे धैर्य दिले.

स्त्री कलाकारांना अभिनयाच्या क्षेत्रात काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तालमींच्या वेळा, रात्री उशिरा संपणारे प्रयोग, प्रवास, शिक्षण किंवा नोकरीची जबाबदारी आणि कौटुंबिक अपेक्षा यांचा समतोल राखावा लागतो. काही वेळा समाजाच्या प्रश्नार्थक नजरेलाही सामोरे जावे लागते.

मात्र कुटुंबीयांचा विश्वास आणि स्वतःच्या कलेवरील निष्ठा असेल, तर या अडचणींवर मात करता येते, हे तिच्या प्रवासातून दिसून येते. रंगभूमी ही स्त्रियांसाठी केवळ मनोरंजनाचे क्षेत्र नाही; तर त्यांच्या विचारांना, भावनांना आणि व्यक्तिमत्त्वाला अभिव्यक्त होण्यासाठी मिळालेले प्रभावी व्यासपीठ आहे.

नाटक आणि नृत्याची आवड जोपासताना त्याने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. अभ्यास, तालमी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्यप्रयोग यांचा समतोल साधण्यासाठी तिला मेहनत घ्यावी लागली. कलाकार म्हणून घडत असताना एक सुशिक्षित आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून स्वतःला विकसित करण्याचा तिचा प्रयत्न राहिला.

एका परिचित व्यक्तीकडून मला 'हे बेबी' या नाटकासाठी विचारणा झाली. नाटकाची संकल्पना व्यावसायिक स्वरूपाची होती. त्यातील भूमिका एका कडक स्वभावाच्या विवाहित महिलेची होती. त्यामुळे सुरुवातीला ही भूमिका आपल्याला जमेल का, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला.

मात्र, दिग्दर्शकाने या व्यक्तिरेखेचे स्वरूप समजावून सांगितल्यानंतर मी ती भूमिका स्वीकारली. या व्यक्तिरेखेत अनेक भावनिक छटा होत्या. भूमिका साकारताना तिचा स्वभाव हळूहळू विकसित करावा लागला. नाटकातील ही स्त्री मनाने खंबीर असली, तरी तिच्या मनात अनेक गोंधळ चालू असायचे.

अनेक अडचणींवर केली मात...

परिदा यांच्या प्रवासात मात्र अडचणींना थांबण्याचे कारण न बनवता त्यातून मार्ग काढण्याची वृत्ती दिसते. रंगभूमीवर काम करताना प्रत्येक प्रयोग हा स्वतःला तपासण्याची संधी आहे, या भावनेने त्यांनी भूमिका स्वीकारल्या. प्रेक्षकांच्या प्रतिसादातून मिळणारा अनुभव आणि सहकलाकारांकडून मिळणारे मार्गदर्शन यामुळे त्यांची कलात्मक वाटचाल अधिक समृद्ध होत गेली.
आयुष्यात अनेक दुःखद प्रसंगांना सामोरे जावे लागले. गर्भारपणानंतरची तिची मानसिक अवस्था आणि त्यावेळचे भावनिक संवाद सादर करणे अत्यंत कठीण होते. हे नाटक विनोदी स्वरूपाचे असले, तरी त्या प्रसंगात प्रेक्षकांना स्त्रीच्या वेदनेची जाणीव करून देण्याचे मोठे आव्हान माझ्यासमोर होते.

एका नाट्यस्पर्धेत मला नकारात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्या भूमिकेचा स्वभाव माझ्या वास्तववादी स्वभावापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. त्यामुळे ती भूमिका करताना मला स्वतःमध्ये अनेक बदल घडवावे लागले. माझ्याच वयाच्या कलाकारांसोबत काम करताना मैत्री आणि भूमिका या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवाव्या लागत होत्या.

भूमिका नकारात्मक असली, तरी ती प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक होते. ती स्वीकारल्यानंतर मी खूप उत्साहित होते. प्रत्येक प्रवेशाचा अभ्यास करून संवाद, हावभाव आणि चेहऱ्यावरील भाव यांचा सातत्याने सराव केला.
कधी रात्री उशिरा प्रयोग संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच पुढच्या कार्यक्रमासाठी प्रवास करावा लागायचा. काही वेळा रेल्वेच्या स्लीपर डब्यात जागा मिळवून प्रवास केला. कलाकारांची आसने वेगवेगळी असल्याने संपूर्ण चमूला एकत्र बसताही येत नसे.

लोकल रेल्वेतील गर्दीचा सामना करत, सामान सांभाळत आणि वेळेवर प्रयोगस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागत असे. या प्रवासात अनेक वेगवेगळे अनुभव आले.
एखाद्या प्रयोगानंतर दुसरी व्यक्ती माझ्या आई-वडिलांना सांगते, "तुमच्या मुलीने काल खूप सुंदर अभिनय केला. ती भूमिका त्याने अतिशय उत्तम प्रकारे साकारली," तेव्हा माझ्या मनात अभिमानाची भावना निर्माण होते. गुरुदास पोळे आणि स्नेहा फोंडेकर यांच्यासह अनुभवी कलाकार व दिग्दर्शकांकडून मार्गदर्शन मिळाले.

अभिनय आणि नाटकाविषयी खरोखरच आवड असेल, तर हे क्षेत्र अभिमानाने स्वीकारा. प्रामाणिकपणे मेहनत करा आणि स्वतःला पूर्णपणे त्या भूमिकेत झोकून द्या. तुमचे काम पाहिल्यानंतर लोकांनी स्वतःहून भेटून "तुमचा अभिनय अप्रतिम होता," असे म्हटले पाहिजे. केवळ नाटक करायचे म्हणून करू नका; प्रत्येक भूमिका जिवंत करण्यासाठी प्रयत्न करा. भाव-भाव उद्योजक धार, जॅकपॉट, हे बेबी, अंबरौत फुले फुलली, बाकी शून्य, आयतो पैसो कष्ट, अधींतर, सवय सायलेंट, सासूबाई व्हायलेंट, रखण, धन्य देवचार, असं नवरा नको गं बाई अशी शेकडो नाटके सादर केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT