Subhash Phaldessai: पाणी वापराएवढीच शुल्क आकारणी; मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती  Pudhari Photo
गोवा

Soham Naik Case | कुडचडे प्रकरणी राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही

Soham Naik Case | मंत्री सुभाष फळदेसाई : पीडितांना न्याय देण्याची दिली हमी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कुडचडेतील गंभीर लैंगिक अत्याचार प्रकरणाने राज्यभर संतापाची लाट उसळली असून सरकारने या घटनेची तातडीने दखल घेत कठोर पावले उचलली आहेत. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या धक्कादायक तक्रारी समोर आल्यानंतर तपास थेट क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे.

या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. जर हस्तक्षेप असता, तर तपास एवढ्या वेगाने पुढे गेला नसता, असे वक्तव्य सांगेचे आमदार तथा समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले.

या प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित सोहम नाईक याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. सुरुवातीला पोलिसांवर दबाव येण्याची शक्यता व्यक्त होताच गृहखात्याने तत्काळ निर्णय घेत तपास क्राईम ब्रँचकडे वर्ग केला. सध्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास वेगाने पुढे जात आहे,

असे सांगत मंत्री फळदेसाई यांनी पीडितांना न्याय देण्याची हमी दिली. या घृणास्पद प्रकरणात तब्बल २० तरुणींना जाळ्यात ओढण्यात आले असून त्यात अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. आतापर्यंत ४ पीडितांनी धाडस दाखवत तक्रार नोंदवली आहे, तर इतरांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

ठोस कारवाईची प्रक्रिया सुरू

पीडितांचा विश्वास जिंकण्यासाठी आणि सत्य बाहेर आणण्यासाठी एनजीओ आणि महिला संघटनांची मदत घेतली जात आहे. या प्रकरणी पॉक्सो आणि गोवा बालक कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवून कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणात दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही आणि या अमानुष कृत्याला जबाबदार असणाऱ्यांना कायद्याच्या कठोर चौकटीत शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले.

गुन्हेगार कोठडीतच राहील याची तरतूद व्हावी

A प्रेमाच्या नावाखाली मुलींचे विशेषतः अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होणे ही अतिशय लज्जास्पद बाब आहे. यातून महिला सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या गुन्हेगाराने अनेक महिलांचा गैरफायदा उठवला. त्याला कोणतीच भीती नसल्याने आणि यापूर्वी कधीच शिक्षा न झाल्याने तो इथवर पोहोचू शकला. त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होऊन तो कोठडीतच राहावा, अशी कायदेशीर तरतूद व्हावी, अशी परखड मागणी महिला कार्यकर्त्या सेसिल रॉड्रिग्ज यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT