Raid  Pudhari
गोवा

Crime Branch Raid | आरोलकरच्या पेढे कार्यालयातून संशयास्पद दस्तऐवज जप्त

Crime Branch Raid | फ्लॅटवर क्राईम ब्रँचची झाडाझडती; अनेक फाईल्सची पडताळणी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
आसगाव-बार्देश येथील सुमारे ४० लाखांच्या भूखंड फसवणूक प्रकरणी अटकेत असलेल्या म्हापसा पालिकेचा माजी नगरसेवक तारक आरोलकर याच्या मालकीच्या पेढे-म्हापसा येथील 'साईचा डेव्हलपर्स' कार्यालयावर, त्याच्या फ्लॅटवर छापा टाकला. यावेळी क्राईम ब्रँच पोलिस अधिकाऱ्यांनी काही संशयास्पद दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक यंत्रणा जप्त केल्याची माहिती सूत्राने दिली.

ही छापेमारी कार्यालय, तसेच फ्लॅटवर एकाचवेळी करण्यात आली. यावेळी संशयित तारक आरोलकर हा सुद्धा कारवाईवेळी घटनास्थळी उपस्थित होता. कार्यालयातील अनेक फाईल्सची पडताळणी, तसेच त्याची चौकशी संशयिताकडून करण्यात आली. सध्या तो क्राईम ब्रँचच्या पोलिस कोठडीत आहे.

त्याची कोठडी उद्यापर्यंत संपत असल्याने तपास अधिकारी ती वाढवून घेण्यासाठी काही अधिक माहिती जमा करत आहेत. छाप्यात कोणती कागदपत्रे किंवा इतर साहित्य जप्त केले काय, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

२ नोव्हेंबर २०२२ रोजी म्हापसा येथे संशयिताने आसगाव, बार्देश येथील सर्व्हे क्रमांक ३७/४ मधील मालमत्तेचा आपण मालक, तसेच त्या मालमत्तेचा व्यवहार करण्यास एकमेव अधिकृत व्यक्ती असल्याचे भासवले.

या मालमत्तेचा हक्क स्पष्ट आणि विक्री योग्य असल्याचे आश्वासन देत संशयिताने तक्रारदाराला विक्रीखत करून देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवून तक्रारदाराने आरोपीला ४० लाखांची रक्कम दिली. मात्र, पैसे स्वीकारल्यानंतरही विक्री खत केले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT