पणजी : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसकडून देशभरात 'मत चोरी' आणि मतदार पडताळणी प्रक्रियेच्या विरोधात आंदोलन सुरू असताना, आम आदमी पाशने (आप) काँग्रेसवर 'पानी चोरी'चा आरोप केला आहे. रविवारी मडगाव येथे झालेल्या गोवा राखण यात्रेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 'मत चोरी'चा मुद्दा उपस्थित केला.
त्यानंतर लगेचच आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी म्हादईच्या पाणीप्रश्नवरून काँग्रेसला लक्ष्य केले. त्यामुळे राज्यात 'मत चोरी' पाठोपाठ 'पानी चोरी'चा मुद्दाही चर्चेत आला आहे. त्यामुळे मत चोरीनंतर पाणी चोरीचा मुद्दा चर्चेत आला आहे.
कर्नाटकतील काँग्रेस सरकार गोव्याकडे येणारे पाणी अडवून म्हादई नदी कोर्डी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नाईक यांनी केला. ''मत चोरी'पेक्षा गोव्यासाठी 'पानी चोरी'चा प्रश्न अधिक महत्त्वाचा असून, राहुल गांधी यांनी त्यावर तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली.
राहुल गांधी यांनी कर्नाटक सरकारला म्हादईवरील सर्व प्रकल्प रद्द करण्यास आणि कळसा-भांडुरा येथे सुरू असलेले काम थांबवण्यास सांगावे, असेही नाईक म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीत 'मत चोरी' आणि 'पानी चोरी' हे दोन्ही मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या युतीत आप सहभागी नसल्याने पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपवर 'मत चोरी', कलम ३९ ए आणि अन्य मुद्द्यांवरून टीका करतानाच काँग्रेसवर म्हादईच्या पाणीप्रश्नवरून हल्लाबोल करण्याची रणनीती आपकडून आखली जाण्याची शक्यता आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याप्रमाणेच राहुल गांधीही म्हादईच्या प्रश्नावर गोमंतकीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला. म्हादई हा आता केवळ राजकीय मुद्दा राहिलेला नसून, तो गोव्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. पुढील वर्षी राज्यावर दुष्काळाचे संकट अधिक गंभीर बनला आहे, असेही त्यांनी नमूद केले.