Casinos  
गोवा

Mandavi Casino | मांडवीत नवा कॅसिनो येणार नाही! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधकांचा दावा खोडून काढला

Mandavi Casino | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : सरकारने परवानगी नाकारली

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

विरोधक व काही लोक कॅसिनोवरुन लोकांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रत्न करत आहेत. मांडवीमध्ये नव्या कॅसिनो जहाजाल परवानी दिली जाणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

बुधवारी दोनापावला येथे लोकायुक्ताच्या शपथविधी सोहळ्यानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना पणजीच्या नागरिकांनी त्याना भेटून केलेल्या कॅसिनोच्या मागणीबाबात विचारले असता ते म्हणाले, कॅसिनोंची संख्या आपल्या काळात वाढलेली नाही. नव्या कॅसिनोला आपण परवानगी दिलेली नाही.

आंदोलन केले होते. त्याच मुद्यावर विधानसभेत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाली. विरोधकांना विधानसभेत व विधानसभेबाहेर कसे तोंड द्यायचे यावर या बैठकीत चर्चा करून नियोजन करण्यात आले. दि. ६ मार्च पासून गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असून त्या अधिवेशनात पक्षाच्या मंत्र्यांनी व आमदारांनी कोणती भूमिका घ्यावी, यावरही बैठकीत चर्चा झाली.

एकूणच विरोधकांच्या कोणत्याही आरोपांना तोंड देण्याचे नियोजन या बैठकीत झाल्याचे कळते. पणजी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्यावर पणजीचे आमदार व महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृतवाखाली उतरलेल्या पॅनलला विजयी करण्याबाबत बैठकीत ठोस नियोजन झाले. तसेच फोंडा पोट निवडणुकीसाठी विरोधक एकत्र आले, तर काय नियोजन करावे यावर विचारमंथन झाले. पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील घडामोडीवरही चर्चा

माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी घेतली लोकायुक्तपदाची शपथ

दोनापाल येथील लोकभवनमध्ये गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी बुधवारी आयोजित समारंभात निवृत्त न्यायमूर्ती संदीप के. शिंदे यांना गोवा लोकायुक्तपदाची शपथ दिली. न्यायमूर्ती शिंदे हे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. या शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वीजमंत्री सुदीन ढवळीकर,

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कृष्णा ऊर्फ दाजी साळकर, मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदावेलू, पोलिस महासंचालक अशोक कुमार, जीएसआयसीचे आयुक्त अरविंद नायर, राज्यपालांचे सचिव अर्जुन मोहन, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव ए. असिन चंद्र तसेच इतर वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील भ्रष्टाचारविरोधी यंत्रणेला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT