Goa Unity Mall Protest 
गोवा

Unity Mall Goa | युनिटी मॉल प्रकल्प बफर झोनबाहेरच; पर्यटन खात्याचे स्पष्टीकरण

Unity Mall Goa | चिंबल युनिटी मॉल वादावर पर्यटन खात्याची सविस्तर माहिती

पुढारी वृत्तसेवा

पणजी : चिंवल पंचायत क्षेत्रात रायबंदर जुने गोवा बायपास रस्त्याकडेला होऊ घातलेल्या युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ या सरकारी प्रकल्पाला विरोध होत असतानाच हा प्रकल्प बफर झोनच्या बाहेर आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले सर्व ना हरकत प्रमाणपत्र आणि चिंबल ग्रामपंचायतीकडून बांधकाम परवाना मिळाल्यानंतरच सुरू झाले आहे, असे स्पष्टीकरण पर्यटन खात्याने दिले आहे.

युनिटी मॉल प्रकल्पाला जिल्हा न्यायालयाने दिलेल्या स्थगितीनंतर चिबल पंचायतीने प्रकल्पासाठी बांधकाम परवाना जारी केला आहे. हा प्रकल्प कायदेशीर आवश्यकतांचे पूर्णपणे पालन करुन बांधला जात आहे. प्रकल्प बफर झोनच्या बाहेर आहे. युनिटी मॉल चिंबल आणि आसपासच्या भागातील रहिवाशांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करेल. आर्थिक स्वातंत्र्य वाढवेल आणि एकूण सामाजिक-आर्थिक विकासाला पाठिंबा देईल, असे पर्यटन खात्याने प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

कौशल्य विकासावर आधारित प्रकल्प :

मंत्री खंवटे युनिटी मॉल प्रकल्प कौशल्य विकास आणि उद्योजकतेवर आधारित आहे. केंद्र सरकारच्या एक जिल्हा, एक उत्पादन उपक्रमाचा भाग हा आहे. कारागीर आणि उद्योजकांना त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी एक समर्पित व्यासपीठ मिळेल. या उपक्रमामुळे पर्यटन उपक्रम वाढतील आणि स्थानिक प्रतिभांची आधुनिक अर्थव्यवस्थेत प्रभावीपणे सहभागी होण्याची क्षमता वाढेल, असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी म्हटले आहे.

नाहक विरोध नको :

केदार नाईक पर्यटन विभागाचे संचालक केदार नाईक यांनीही हा मॉल कौशल्य निर्मिती आणि उद्योजकतेचे केंद्र म्हणूनही काम करेल, असे म्हटले आहे. लोकांनी नाहक या प्रकल्पाला विरोध करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

चिंबलवासीयांचे आज धरणे, 4 रोजी सभा

चिंबल पंचायत क्षेत्रात राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ होऊ घातलेल्या युनिटी मॉलला विरोध करण्यासाठी चिंबलचे नागरिक रविवारी, २८ रोजी धरणे आंदोलन करणार असून ४ रोजी जाहीर सभा घेणार आहेत. शनिवारी चिंबल जैवविविधता समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, सदर प्रकल्प राखीव जागेत होत असल्याने तो बेकायदेशीर ठरतो. या प्रकल्पामुळे जैव विविधता व पर्यावरणाचा हानी होणार असल्याचेही ते म्हणाले. अजय खोलकर यांनी या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उद्याच्या उपोषणाला गोव्यातील एनजीओ पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पाला पंचायतीचा ना हरकत दाखला मिळाला असला तरी त्यापूर्वीच काम सुरू केल्याचा दावा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT