Prescription mandatory for medicines Pudhari
गोवा

Goa FDA List of Banned Medicines | राज्यात 16 औषधांच्या विक्रीवर बंदी

Goa FDA List of Banned Medicines | अन्न व औषध प्रशासन संचालनालयाची माहिती : केंद्राच्या निर्देशाचे पालन

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने १६ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घातल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन संचालनालयाने (एफडीए) दिली आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम, १९४० च्या कलम २६ अ अंतर्गत ही बंदी घालण्यात आली आहे.

ड्रग्ज टेक्निकल अॅडव्हायजरी बोर्डाच्या शिफारशींनुसार संबंधित औषधांना कोणतेही ठोस उपचारात्मक औचित्य नसल्याचे आढळले आहे. तसेच या औषधांमुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आणि अधिक सुरक्षित पर्याय उपलब्ध असल्याने त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती राज्यातील सर्व औषध विक्रेते, घाऊक विक्रेते, उत्पादक, सरकारी व खासगी रुग्णालये, आरोग्य केंद्रे, गोवा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना देण्यात आली आहे.

बंदी घालण्यात आलेल्या औषधांची यादी संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एफडीएने डॉक्टरांना ही औषधे लिहून न देण्याचे आवाहन केले असून, औषध विक्रेत्यांनी त्यांची विक्री व वितरण तातडीने थांबवावे, असे निर्देश दिले आहेत. तसेच रुग्णालये, दवाखाने आणि औषध दुकानांनी साठ्यातील औषधे हटवून ती पुरवठादारांकडे परत पाठवावीत, असेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

'या' औषधांवर बंदी

१. अॅसिटाइल सॅलिसिलिक अॅसिड अॅथॉहेप्टाझीन,

२. अॅलोवेरा जोजोबा तेल + व्हीट जर्म ऑइल + टी ट्री ऑइल,

३. अमॉक्सिसिलिन सेराटिओपेप्टिडेज + लॅक्टोबॅसिलस स्पोरोजेन्स,

४. डायसायक्लोमाइन पॅरासिटामॉल क्लिडिनियम ब्रोमाइड + क्लोरडायझेपॉक्साइड,

५. अमॉक्सिसिलिन + सेराटिओपेप्टिडेज,

६. अॅलो एक्स्ट्रॅक्ट + अलॅन्टॉइन अल्फा-टोकोफेरॉल अॅसिटेट डी-पॅन्थेनॉल + व्हिटॅमिन अ,

७. अॅलो एक्स्ट्रॅक्ट व्हिटॅमिन ई डायमेथिकोन ग्लिसरीन,

८. अॅलोवेरा + जोजोबा तेल व्हिटॅमिन ई,

९. अॅलोवेरा ऑरेंज ऑइल,

१०. अॅलोवेरा + व्हिटॅमिन ई हर्बल घटक,

११. डायसायक्लोमाइन + पॅरासिटामॉल + क्लिडिनियम ब्रोमाइड,

१२. पॅरासिटामॉल लिनोकेन (लिडोकेन),

१३. ग्लिक्लाझाइड + क्रोमियम पिकोलीनेट,

१४. अमॉक्सिसिलिन क्लॉक्सासिलिन + लॅक्टिक अॅसिड बॅसिलस सेराटिओपेप्टिडेज,

१५. सेफॅड्रॉक्सिल + प्रोबेनेसिड

१६. सेफ्युरॉक्सिम + सेराटिओपेप्टिडेज.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT