Goa High Court Pudhari
गोवा

Cansaulim Gangrape Case | कासावली गँगरेप प्रकरण : संशयित शहजाद शेखला न्यायालयाचा झटका; जामीन अर्ज फेटाळला

Cansaulim Gangrape Case | मतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्याला दिलासा नाहीच; दक्षिण गोवा न्यायालयाचा मोठा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

सासष्टी : कासावली येथील एका गेस्टहाउस मध्ये मतिमंद मुलीवर गॅंगरेप सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी पोलीसांनी अटक केलेले संशयित शहजाद शेख याचा जामीन अर्ज दक्षिण गोवा जिल्हा प्रधान सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश शेरीन पॉल यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.

गेल्या वर्षी २३ जानेवारी रोजी ही बलात्काराची वरील घटना घडली होती. मडगावच्या कदंबा बसस्थानकावरून त्या मुलीचे अपहरण करून मागाहून तिच्यावर पांच जणांनी सामुहिक बलात्कार केला होता.

नंतर संशयितांनी तिला नुवे जंक्शनवर आणून सोडले होते. तिथे ती रडत उभी असताना त्या मार्गावरून जाणाऱ्या एका इसमाने तिला पाहिले. संशय आल्याने त्यांनी तिची विचारपूस केली असता, तिच्यावर गॅंग रेप झाल्याचे मुलीने सांगितले व नंतर या बलात्कार प्रकरणाला वाचा फुटली होती.

फातोर्डा पोलिसांनी या प्रकरणी आदिल अलगूर, मोहम्मद मुल्ला, शहजाद शेख, विरेश अंगुडा व मोहम्मद शेख या संशयितांना अटक केली होती.

संशयिता विरुद्धचा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा जामीन अर्ज फेटाळला जात असल्याचे न्यायाधीश शेरीन पॉल यांनी आपल्या निवाड्यात स्पष्ट केले. तसेच ज्या गेस्ट हाऊस मध्ये बलात्काराची घटना घडली होती, तेथे खोली संशयित शहजाद याने आरक्षित केली होती हे पोलिस तपासात उघड झाले आहे अशी टिप्पणी करून न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज नामंजूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT