Goa Coal Jetty Protest | कोळसा जेट्टी नकोच! कुडचडेतील ग्रामस्थांची पणजीत धडक; प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर ठिय्या

Goa Coal Jetty Protest | प्रदूषण मंडळासमोर धरणे : प्रकल्प रद्द करण्याची मागणी
Coal Protest
Coal Protest
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कुडचडे मतदारसंघातील असोल्डा, शेळवण, होडार परिसरातील ग्रामस्थांनी आज, सोमवारी पणजी येथील गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर धरणे धरून प्रस्तावित कोळसा जेट्टी प्रकल्प तत्काळ रद्द करण्याची मागणी केली. आठ दिवसांच्या आत निर्णय न घेतल्यास सर्व गावकरी एकत्र येऊन आंदोलन अधिक तीव्र करतील ,असा इशाराही त्यांनी दिला.

Coal Protest
Ketan Bhatikar Congress Entry | सर्व शंकांना पूर्णविराम; डॉ. केतन भाटीकर यांचा आज अधिकृत काँग्रेस प्रवेश

या आंदोलनात स्थानिक आमदार निलेश काब्राल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, सामाजिक कार्यकर्ते रोहन देसाई तसेच विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांनी या प्रकल्पामुळे होणारे संभाव्य पर्यावरणीय दुष्परिणाम अधोरेखित करत हवा व पाण्याचे प्रदूषण वाढण्याची भीती व्यक्त केली. कोळसा हाताळणीमुळे शेती, जलस्रोत आणि स्थानिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे आंदोलकांनी सांगितले. "विकासाच्या नावाखाली पर्यावरणाशी आणि लोकांच्या आरोग्याशी तडजोड मान्य नाही," असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

शेळवण-होडार येथे प्रस्तावित असलेल्या ''मल्टीबर्थ कार्गो जेटी'' विरोधात सर्व ग्रामस्थ आक्रमक झाले होते. ही जेटी केवळ कोळसा हाताळणीसाठीच बांधली जात असल्याचा आरोप करत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली पणजीतील पर्यावरण खात्याच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.

या प्रकल्पासाठी सरकार ठराविक कंत्राटदारांना का संरक्षण देत आहे, असा सवाल पाटकरांनी उपस्थित केला . बाळकृष्ण होडारकर यांनी सरकारवर टीका केली. संबंधितांना सूचना देऊनही प्रशासन मौन बाळगून आहे,असा आरोप त्यांनी केला.

Coal Protest
Vishwajit Rane Bungalow Protest | गोव्यात जनक्षोभ उसळला! मंत्री विश्वजित राणे यांच्या बंगल्यावर आंदोलकांची धडक

पाटकर - काब्राल यांच्यात बाचाबाची

आंदोलनादरम्यान अमित पाटकर आणि भाजपचे आमदार निलेश काब्राल यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. भाजप सरकार स्वतःच्याच आमदारांचे ऐकत नसल्याचा आरोप पाटकरांनी केला व मुख्यमंत्र्यांना लोकांच्या या प्रश्नावर फोन करण्याची मागणी काब्राल यांच्याकडे केली.

एका आंदोलकाची प्रकृती ढासळली

धडक मोर्चासाठी आलेल्या गावकऱ्यांमध्ये विविध वयोगटातील स्त्री पुरुष होते.सकाळपासून सर्वजण कार्यालयासमोर धरणे धरून होते.दुपारच्या दरम्यान त्यातील एका प्रौढ आंदोलनाला अचानक चक्कर आली आणि ते कोसळले.आंदोलनस्थळी १०८ रुग्णवाहिका तैनात होती.त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news