रोमिओ लेन नाईट क्लब आगीप्रकरणी उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेतली.
त्यानंतर कळंगुट पंचायतीने २१ नाईट क्लब व रेस्टॉरंट्सना नोटीस बजावली.
तीन दिवसांत अग्निशमन व इतर आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्याचे आदेश दिले.
मुदतीत कागदपत्रे न दिल्यास आस्थापने बंद करण्याचा इशारा देण्यात आला.
म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमधील अमितांडवाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांवर ताशेरे ओढल्यानंतर कळंगुट पंचायती खडबडून जागी झाली आहे. पंचायतीने २१ नाईट क्लब व रेस्टॉरंट यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
तीन दिवसांत आवश्यक प्रमाणपत्रे सादर न केल्यास आस्थापने बंद केली जातील, असा इशारा संबंधितांना देण्यात आला आहे. हडफडे येथील क्लबला लागलेल्या भीषण आगीत पाच पर्यटकांसह सुमारे २५ जणांचा मृत्यू झाला. या भीषण घटनेची दखल घेत उच्च न्यायालयाने स्वेच्छा याचिका दाखल करत स्थानिक स्वराज्य संस्थांसह सरकारवर ताशेरे ओढले.
त्यानंतर कळंगुट पंचायतीने या नोटिसा बजावल्या आहेत. सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी सांगितले की पंचायतीने २१ आस्थापनांना नोटीस बजावली आहे. या आस्थापनांकडे अग्निशमन व इतर प्राधिकरणांचे दाखल्यांसंदर्भात पडताळणी करण्यासाठी या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत
यांना बजावल्या नोटिसा...
नोटिसा बजावलेल्यांमध्ये कॅफे टाऊन, कॅफे डाऊन टाऊन, रिकीज, टिंटोज, कॅफे मॅम्बो, मायामी रेस्टॉरंट, माया, एक्स्ट्रीम, दी व्हाईट गोवा-व्हायब्रेट, कॉकटेल्स अँड ड्रीम्स, दी पिंक एलिफंट, पाय ईविजा, कॉकटेल अँड ड्रीम एक्सप्रेस, हेन्नी डेन बाय क्लब मियामी, हॅवेली बाय क्लब मियामी, कोया, लिजीओन, फेनिक्स बीच क्लब, सोहो, हॅमर्स नाईट क्लब, कर्मा, गेट हाय या क्लब बजा रेस्टॉरंट