Betoda Panchayat News 
गोवा

Betoda Panchayat News | संरक्षण भिंतीमुळे धूप रोखण्यास होणार मदत

Betoda Panchayat News | जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर : संरक्षक भिंतीच्या कामाचा शुभारंभ

पुढारी वृत्तसेवा

बोरी : पुढारी वृत्तसेवा

शिरोडा मतदारसंघातील बेतोडा पंचायतीच्या शेळवाडा निरंकाल येथे संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करून कामाचा शुभारंभ मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या संरक्षण भिंतीच्या बांधकामामुळे माती धूप रोखण्यास मदत होणार असून, जवळील निवासी भागांचे संरक्षण होईल. यामुळे सुरक्षिततेसह पायाभूत सुविधांना बळकटी मिळेल, असे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमास जिल्हा पंचायत सदस्य पूनम सामंत, सरपंच मधु खांडेपारकर, पंच सदस्य व भाजप शिरोडा अध्यक्ष अक्षय गावकार, पंच सत्यवान सामंत, विद्या गावकार, वैशाली सालेलकर तसेच जलसंपदा विभागाचे कनिष्ठ अभियंता संदेश पैगिटकर उपस्थितीत होते.

स्वागत पंच सत्यवान सामंत यांनी केले पाहुण्यांना गुलाब पुष्प पंच विद्या गावकार, पंच वैशाली सालेलकर यांनी प्रदान केले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य पूनम सामंत सरपंच मधु खांडेपारकर यांनी विविध सूचना करून मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या मुळे बेतोडा निरंकाल पंचायतीच्या सर्व समस्या सुटण्यास मदत होणार, असे सांगून आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT