लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; तिसवाडीतील जीम मालकाविरुद्ध गुन्हा दाखल! file photo
गोवा

Foreign Woman Rape Case | परदेशी महिलेवरील बलात्कारप्रकरणी बंगळुरुस्थित खासगी कंपनीच्या सीईओला पणजी महिला पोलिसांकडून अटक

Foreign Woman Rape Case | सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित महिलेने काही दिवसांपूर्वी पणजी महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
परदेशी नागरिक असलेल्या महिलेवर बलात्कार केल्याच्या कथित प्रकरणात पणजी महिला पोलीस ठाण्याने बंगळुरुस्थित एका खासगी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला (सीईओ) अटक केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित महिलेने काही दिवसांपूर्वी पणजी महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत तिने सीईओविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. तक्रारीची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला.

तक्रारीतील आरोपांची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर बंगळुरुस्थित खासगी कंपनीच्या सीईओला अटक करण्यात आली. पोलिसांकडून या प्रकरणातील घटनाक्रम, आरोपी आणि पीडित महिलेील संबंध तसेच कथित घटना नेमकी कुठे आणि कधी घडली, याबाबत तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT