Cricket Stadium 
गोवा

Goa Cricket Match | गोव्याचा एक डाव आणि 135 धावांनी पराभव

Goa Cricket Match | रणजी क्रिकेट : बडोदाच्या गोलंदाजांनी राखले वर्चस्व

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजी जिमखाना मैदानावर खेळवण्यात आलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बडोदा संघाने यजमान गोव्याचा एक डाव आणि १३५ धावांनी पराभव केला. सामन्याच्या चौथ्या दिवशी गोव्याचा दुसरा डाव ६८ षटकांत केवळ १३८ धावांत आटोपला.

नाणेफेक जिंकून पाहुण्या संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. बडोद्याने पहिला डाव ८ बाद ४७२ धावांवर घोषित केला होता. त्याचा पाठलाग करताना गोव्याचा पहिला डाव १९९ धावांतच आटोपला. त्यामुळे पाहुण्यांना २७३ धावांची मोठी आघाडी मिळाल्याने यजमानांवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली.
दुसऱ्या डावात शिवेंद्र भुजबळ (४६) आणि कर्णधार अभिनव तेजराणा (४७) यांनी ८० धावांची भागीदारी करत गोव्याच्या आशा जिंवत ठेवल्या होत्या. मात्र अभिनव बाद होताच डाव गडगडला. एक बाद ९२ वरून गोव्याचा पूर्ण संघ १३८ धावांत गारद झाला.

नऊ फलंदाजांनी केवळ ४६ धावा केल्या. स्नेहल कवठणकर, दीपराज गावकर, मोहित रेडकर, ऋत्विक नाईक आणि शुभम तारी हे पाच फलंदाज तर खातेही खोलू शकले नाहीत. दर्शन मिसळ १७ धावांवर नाबाद राहिला, तर ललित यादवने १२ धावा केल्या.
बडोदाच्या विजयात फिरकीपटू भार्गव भटचा मोठा वाटा होता. त्याने ३२ धावांत ५ फलंदाजांना तंबूंत परत पाठवले. महेश पिठियाने ६६ धावांत ४ बळी घेत त्याला साथ दिली, तर राज लिंबाणीने एक गडी बाद केला. पिठिया 'सामनावीर' ठरला.

संक्षिप्त धावफलक:

  • बडोदा (पहिला डाव): १८७ षटकांत ८ बाद ४७२ (घोोषित). अजित शेठ ९१, मितेश पटेल ८९, शाश्वत रावत ६१, शिवालिक शर्मा ६२, दीपक हुड्डा ५२; मोहित रेडकर ३-१२०, दर्शन मिसळ १-४०, ऋत्विक नाईक १-४२, शुभम तारी १-७३.

  • गोवा (पहिला डाव): ७९.१ षटकांत सर्वबाद १९९. ललित यादव ५४, स्नेहल कवठणकर ५०; महेश पिठिया ५-५८, भार्गव भट ४-५१, रसिक सलाम १-२८.

  • गोवा (दुसरा डाव): ६८ षटकांत सर्वबाद १३८. अभिनव तेजराणा ४७, शिवेंद्र भुजबळ ४६; भार्गव भट ५-३२, महेश पिठिया ४-६६, राज लिंबाणी १-८.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT