म्हापसा : बार्देश तालुक्याचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नसताना जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. काही वेळा भूमिगत जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे फुटते तर काही वेळा वीज खात्याच्या किंवा रस्ते खात्याच्या निष्काळजीपणामुळे जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार होत आहेत. मंगळवारी गिरी येथे टाकण्यात आलेला कचरा उचलताना जेसीबी लागून जलवाहिनी फुटली.
रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आलेला कचरा काढण्याचे काम जेसीबीच्या माध्यमातून सुरू होते. हा जेसीबीचा धक्का लागल्याने जलवाहिनी फुटली. त्यामुळे दुपारपर्यंत पाण्याचे फवारे उडत होते.
सायंकाळी उशिरापर्यंत सदर जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम सुरू होते. मात्र, यामुळे तालुक्यातील पाणीपुरवठा ठप्प झाला होता.