Panjim Babush Monserrate 
गोवा

Babush Monserrate | उत्पल पर्रीकर यांच्या पक्षात परतण्याच्या निर्णयाचे महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी केले स्वागत

Babush Monserrate | लक्ष्मीकांत पार्सेकरांच्या प्रवेशाबाबत निर्णय दोन दिवसांत

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
उत्पल पर्रीकर यांनी पक्षात परतणे हा एक स्वागतार्ह निर्णय ठरेल, उशीर झाला तरी चालेल; पण योग्य वेळी घेतलेला हा निर्णय आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनीच गोव्यात हा पक्ष तळागाळापर्यंत नेला आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाने पक्षात परतणे ही अत्यंत स्वाभाविक आणि योग्य गोष्ट असल्याचे बाबुश यांनी स्पष्ट केले.

पक्षाच्या निर्णयात आपण कसलाही अडथळा आणणार नाही, अशी प्रतिक्रिया पणजीचे आमदार व महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दोन दिवसांत पुन्हा भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे.

येत्या निवडणुकीचा विचार करून पक्षापासून दूर गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याचे आपने ठरवले आहे. त्यानुसार शुक्रवारी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उत्पल पर्रीकर यांना पक्षाने चर्चेला बोलावले होते. बाबुश यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना उत्पल पर्रीकर यांचे स्वागत करत असल्याचे म्हटले आहे.

मोन्सेरात म्हणाले की, यावर पक्षश्रेष्ठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, निवडणुकीच्या वेळी किंवा प्रसंगी या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली जाईल. भूतकाळात काही मतभेदांमुळे पक्ष सोडलेल्या सर्व नेत्यांना पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन केले. ज्या नेत्यांनी पक्षाच्या उभारणीत कष्टाचे योगदान दिले आहे, त्यांनी पुन्हा पक्षात परत यावे आणि सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन दिवसांत निर्णय : पार्सेकर

माझा पुढील निर्णय दोन दिवसांत कळेल, अशी माहिती प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली आहे. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षासोबत माझे अनेक वर्षांचे नाते आहे. २०२२ मध्ये आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असली तरी अन्य कोणत्याही paksat प्रवेश केलेला नाही. आपण भाजपच्या जवळच आहे. येत्या दोन दिवसांत आपला निर्णय सर्वांना कळेल, असे त्यांनी सांगितले.

विद्यमान आमदारांनी घाबरण्याचे कारण नाही

भाजपचे माजी नेते व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर किंवा उत्पल पर्रीकर यांना भाजपमध्ये घेण्यात येत असले तरी कोणत्याही स्थानीय आमदारांनी घाबरण्याचे कारण नाही. पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमांतर बोलताना दिली. उत्पल पर्रीकर यांना घेण्यात येत असल्यामुळे पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांचे काय होणार, असा प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT