Panaji Municipal Corporation Reservation 
गोवा

Panjim Municipal Election 2026 | अर्ज माघारी प्रक्रियेनंतरच अंतिम यादी स्पष्ट

Panjim Municipal Election 2026 | मंत्री बाबुश मोन्सेरात; पॅनेल उघड झाल्यावर खळबळ, नंतर घूमजाव

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजी महापालिका निवडणुकीसाठीच्या भाजप समर्थक उमेदवार निवडीची प्रक्रिया सध्या सुरू असून प्राप्त अर्जाची छाननी पूर्ण झाली आहे. उमेदवारी अर्ज (नामांकन) शुक्रवारी (२० फेब्रुवारी) दाखल केले जाणार आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भाजप समर्थक पॅनेलची माहिती दिली जाईल, अशी माहिती मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी दिली. उमेदवारांचे पॅनेल उघड झाल्याने बरीच खळबळ माजल्यानंतर मोन्सेरात यांनी घूमजाव केले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, उमेदवारी अर्ज (नामांकन) शुक्रवारी दाखल केले जाणार आहेत. अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख संपल्यानंतरच उमेदवारांची अंतिम यादी स्पष्ट होईल.

आवश्यकतेनुसार बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचीही अजूनही वाव आहे, असे मोन्सेराते यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणूक इच्छुक असलेल्यांनी उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज सादर केले आहेत त्याची गेल्या पंधरा दिवसांपासून मुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या संमतीने या अर्जाची छाननी सुरू आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर किती नवीन चेहरे आहेत व भाजप समर्थन पॅनलमध्ये कोण आहेत हे स्पष्ट होईल. पक्षाच्या आदेशाचे पालन करण्यात येत आहे. ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर नसली तरी भाजप समर्थक उमेदवारांचे पॅनेल निवडणुकीत उभे केले जाईल असे मोन्सेरात यांनी सांगितले.

महापालिकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मंत्री बाबुश मोन्सेरात यांचे टुगेदर फॉर प्रोग्रेसिव्ह या नावाने ३० उमेदवारांचे पॅनल सोशल मीडियावर तसेच काही वृत्तपत्रात त्याची माहिती उघड झाल्यावर बरीच खळबळ माजली.

या पॅनलमध्ये जागा न मिळालेल्या काही असंतुष्ट उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. ही माहिती प्रसारमाध्यमांसमोर आल्याने मंत्री बाबुश मोन्सेरातही नाराज झाले. आता तर त्यांनी घूमजाव केले आहे.

कॅसिनो नूतनीकरणावेळी निर्णय घेऊ

निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच कॅसिनोंकडून झालेल्या कथित अतिक्रमणांवर कारवाईसाठी पावले उचलली होती. मात्र या प्रक्रियेनंतर आपल्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल झाली. कॅसिनो अतिक्रमणाच्या मुद्द्यावर आपण निष्क्रिय राहिलो, हे आरोप मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी फेटाळून लावले.

कॅसिनो परवाना नूतनीकरण २०२७ मध्ये होणार आहे. त्यावेळी प्रक्रियेदरम्यान हा विषय पुन्हा विचाराधीन घेता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही संघटना कॅसिनोविरोधात ठाम भूमिका घेत असल्या, तरी कॅसिनो परिसरातील व्यवसायिकांच्या चिंताही सरकारने लक्षात घ्यायला हव्यात कारण पणजीतील काही आस्थापने ही कॅसिनोच्या निमित्ताने येणाऱ्या पर्यटकांमुळे व्यवसाय करत आहेत, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT