Panjim Babush Monserrate 
गोवा

Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

Babush Monserrate Panjim | पणजी विधानसभेतूनच लढणार! मंत्री बाबूश मोन्सेरात यांचा राजकीय चर्चांवर मोठा खुलासा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा


आगामी विधानसभा निवडणुकीत आपण फक्त पणजी मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहे. सांताक्रूझ मतदारसंघातून मी लढणार असल्याच्या सर्व अफवा निराधार आहेत, असा स्पष्ट खुलासा पणजीचे आमदार व महसूलमंत्री अतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांनी केला. त्यामुळे सांताक्रूझमधून निवडणूक मोन्सेरात लढवतील या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

बाबूश म्हणाले, मी स्पष्टपणे सांगतो की, माझ्याबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही. मी केवळ पणजीतूनच निवडणूक लढवणार आहे.
सांताक्रूझच्या आमदारांना एवढी भीती का वाटते? असा प्रश्न करून बाबूश मोन्सेरात म्हणाले, सांताक्रूझ येथे सुरू करण्यात आलेले कार्यालय हे माझे वैयक्तिक कार्यालय असून त्याचा भाजपशी कोणताही संबंध नाही.

मी माझे कार्यालय कुठेही सुरू करू शकतो. वैयक्तिक कार्यालय सुरू करण्यासाठी मला कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही. माझी उपस्थिती त्यांच्या सावलीसारखी वाटत आहे आणि त्यामुळे ते घाबरले आहेत.
तथापि, त्यांनी भाजप किंवा सांताक्रूझच्या आमदारांशी कोणतेही मतभेद नसल्याचेही स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT