Mopa Airport 
गोवा

Mopa Airport Protest | मोपा विमानतळ रस्ता बंद केल्याने बाबू आजगावकर आक्रमक; अधिसूचना मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा

Mopa Airport Protest | माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा सरकारला इशारा

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा रस्ता आणि गेट खुले केले नाही आणि संबंधित अधिसूचना तातडीने मागे घेतली नाही तर जनतेसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी दिला आहे.

मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील बंद करण्यात आलेल्या रस्त्याच्या पार्श्वभूमीवर आणि विमान प्राधिकरण संचालकाने काढलेल्या अधिसूचनेबाबत आजगावकर यांनी संताप व्यक्त केला.

आजगावकर म्हणाले की, आमदार प्रवीण आर्लेकर असताना ही अधिसूचना सरकारने काढली कशी ? त्यांना विश्वासात घेतले नाही का, की त्यांनीच ते काढायला दिली, असा प्रश्न विचारत सरकार अधिसूचना सरकार मागे न घेतल्यास आमदाराने राजीनामा देणे उचित ठरेल. ते म्हणाले, रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांना नाहक सुमारे १५ कि. मी.चा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.

मोप विमानतळासाठी येथील लोकांनी आपल्या जमिनी दिल्या. त्यामुळे विमानतळ उभा राहिला आहे. मात्र, सरकार जनतेकडे सहानुभूतीने पाहण्याऐवजी त्यांनाच त्रास देत आहे. जीएमआर कंपनी लोकांच्या भावना आणि अडचणींकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने वागत आहे.

सरकारने तातडीने ही अधिसूचना मागे घेऊन विमानतळावर जाणारा रस्ता त्वरित खुला करावा. यापूर्वीही आम्ही सरकारचा असाच डाव आम्ही हाणून पाडला होता. आता आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही आजगावकर यांनी दिला. यावेळी माजी सरपंच प्रदीप कांबळी, नारायण तळकटकर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT