दुबई : वृत्तसंस्था
जागतिक व्यापार आणि तेलपुरवठ्यातील विस्कळीततेमुळे एप्रिल महिन्यात विमानांच्या इंधनात तब्बल १२१.१ टक्क्यांची अफाट वाढ झाली, तर कच्च्या तेलाचे दर ७७.७ टक्क्यांनी वाढले आहेत, अशी माहिती इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या अहवालात देण्यात आली आहे.
आयएटीएचे महासंचालक विली वॉल्श यांनी सांगितले की, इंधनाचे दर दुप्पट झाल्याने विमान कंपन्या हा yok वाढीव खर्च थेट ग्राहकांवर ढकलत आहेत, त्यामुळे तिकिटांचे दर वाढत आहेत. प्रवासी संख्येत मोठी घट अमेरिक-इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांना आपले मार्ग बदलावे लागले होते.
यामुळे एप्रिल २०२६ मध्ये मध्य पूर्वेतील विमान कंपन्यांच्या प्रवासी मागणीत ४६.६ टक्क्यांची मोठी घट नोंदवली गेली. या घसरणीमुळे जागतिक प्रवासी बाजारपेठेतही ३.४ टक्क्यांची घट झाली आहे. मात्र, मार्च महिन्याच्या तुलनेत (जेव्हा ५९.२ टक्के घसरण झाली होती) ही परिस्थिती काहीशी सुधारली आहे.