girl assault  file photo
गोवा

Minor Girl Assault | गोव्यात काय चालू आहे? कुडचडेनंतर आता मुरगाव हादरले; 15 वर्षीय मुलीवर 2 वर्षे अत्याचार

Minor Girl Assault | कुडचडे येथील लैंगिक अत्याचार प्रकरण गाजत असतानाच मुरगाव तालुक्यात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून वारंवार लैंगिक अत्याचार होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा

कुडचडे येथील लैंगिक अत्याचार प्रकरण गाजत असतानाच मुरगाव तालुक्यात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून वारंवार लैंगिक अत्याचार होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

याप्रकरणी अरुण चव्हाण (२३ वर्षे, रा. बायणा-वास्को) याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या आईने वेर्णा पोलिस स्थानकात याप्रकरणी तक्रार नोंदवली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२४ ते ३० मार्च २०२६ या दोन वर्षांच्या कालावधीत संशयित अरुण याने पीडितेचा वारंवार विनयभंग केला आणि तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

हे घृणास्पद कृत्य सांकवाळ येथील पीडितेच्या राहत्या घरी आणि वेळसांव समुद्रकिनाऱ्यावरील निर्जन स्थळी घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन संशयिताने तिला आपल्या वासनेचा शिकार बनवले होते.

वेर्णा पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम ६५ (१), गोवा बाल कायदा कलम ८ (२) आणि पोक्सोच्या कलम ४ आणि ८ नुसार गुन्हा नोंदवला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक प्रमिला फर्नांडिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT